Hard Copy Price:
15% OFF R 400R 340
/ $
4.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद, आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित भेद...
अशावेळी ’एड्स’सारख्या शारीरिक रोगानं पीडित, समाजाच्या विखारी आरोपी नजरांच्या विळख्यात आणि कुटुंबाच्या गिलोटीन खाली जगण्याचा प्रयत्न करणार्यांचं काय होत असेल? हे सगळे मिळून किती तर्हांनी डोकी ’भिन्न’ करतात.
पण एका क्षणी अशांचं हे वेगळेपणच शक्ती, ऊर्जा, चेतना झालं तर?
आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू लागलेलं असतानाच मरणंही निरर्थक आहे, याची पाठोपाठ झालेली जाणीव!
अशावेळी आपल्या वाट्याला येणार्या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा असं वाटणार्या, जगावंसं वाटणार्या, चांगलं जगावंसं वाटणार्या ’एड्स’ ग्रस्तांची ही कहाणी. माणसांना ’भिन्न’ करणार्या शकलित बुद्धीच्या माणसांपेक्षा या अशा प्रकारे ’भिन्न’ ठरलेल्यांची कहाणी-
कविता महाजन या मराठी साहित्याच्या समकालीन काळातील एक महत्त्वाच्या लेखिका आहेत. त्यांची स्त्रीकेंद्री भूमिका, वास्तववादी आशय व थेट- प्रयोगशील शैलीमुळे त्या मराठीतील आघाडीच्या लेखिका म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांच्या 'ब्र' कादंबरीनंतरची 'भिन्न' ही कालानुक्रमे दुसरी कादंबरी आहे. वर्तमानकालीन जनसमूहाचे वास्तववादी चित्रण हा या कादंबरीचा मुख्य विषय आहे. मानवतावादी दृष्टिकोनावर व उच्च नवमूल्यांवर आधारलेली ही कादंबरी मराठी कादंबरीच्या वाटचालीतील एक वेगळी व अंतर्मुख करायला लावणारी साहित्यकृती आहे. प्राचीन काळापासून माणसा- माणसांमध्ये जात- धर्म, रंगभेद- आर्थिकभेद, स्त्री- पुरुष लिंगभेद, श्रेष्ठ- कनिष्ठ असे विविध संघर्ष कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने चालत आलेले आहेत. मानवी इतिहासातील असे चिरंतन संघर्ष 'भिन्न' या कादंबरीचे मध्यवर्ती आशयसूत्र आहे. त्यामुळे एकीकडे चिंतनशील तर दुसरीकडे समस्याप्रधान असे या कादंबरीचे स्वरुप आहे. अर्थात कादंबरीतील एड्सग्रस्त स्त्रियांची समस्या ही येथे निमित्तमात्र असून, वर्तमानकालीन स्त्रियांच्या 'नवं समस्या व नवं आयुधे' यांचा चिंतनात्मक पातळीवर कलात्मक शोध यात घेतला आहे.