प्राकृतिक भूगोलाचे हे पुस्तक अत्यंत उपयुक्त असून सोप्या भाषेत प्राकृतिक भूगोलातील संज्ञा, संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. MPSC, सेट, नेट, बी.ए. आणि एम.ए. च्या भूगोल अभ्यास क्रमावर आधारित हे पुस्तक वाचून महत्त्वाची भौगोलिक माहिती मिळाली. यामध्ये अनेक घटक...आकृत्या, सांख्यिकीय माहीती आणि उदाहरणाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहेत. लेखकांच्या अध्यापन क्षेत्रातील अनुभवाचे प्रतिबिंब सदर ग्रंथ लेखनात पडलेले दिसून येते...प्राकृतिक भूगोलाचे हे दर्जेदार आणि परिपूर्ण पुस्तक आहे...