Summary of the Book
विद्वान संशोधक डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीतील पैठणचा आणि पैठण परिसराचा सहभाग या पुस्तकातून स्पष्ट केला आहे. प्रादेशिक इतिहासाचा पुरातत्वीय आधाराच्या साहाय्याने मागोवा, हे या संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. पैठण परिसरात प्रागैतिहासिक दाखले आढळतात.
डॉ. मोरवंचीकर यांनी तत्कालीन इतिहासापासून आर्यीकरण, नागरीकरण आणि पुढील टप्पे वर्णिले आहेत. या पुस्तकात त्यांनी जसे शिल्पांचे दाखले दिले आहेत; तसेच कालौघात रीतीरिवाजात झालेल्या बदलांचा मागोवाही घेतला आहे. भौगोलिक, भूगर्भीय परिस्थितीचा विचार करून समकालीन परिस्थितीही अभ्यासली आहे.