तरल
Columbus Publishing And Services Pune Himangi Hadawale - Nawle Lalit Taral कोलंबस पब्लिशिंग अँन्ड सर्विसेस पुणे तरल ललित हिमांगी हडवळे - नवले
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 125 R 94 / $ 1.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Bookbandhu Reviews
30/06/2025

तरल - हिमांगी हडवळे-नवले पुस्तक परीक्षण - ओंकार बागल दिवसभरात आपण कितीतरी ठिकाणांहून हिंडून येत असतो. वाटेत आपल्याला कितीतरी गोष्टी दिसतात, घटना पाहायला मिळतात. एके दिवशी, एखाद्या नेहमीच्या वाटेवर, काही न करता, कुठला तरी आडोसा पकडून, निपचित उभे राहा. शांत, संथ, स्वस्थ, कोणाशी काहीही न बोलता.. बस्स येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अलगदपणे पाहत राहा, निरीक्षण करा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव दिसेल, एक निर्विकार भाव! म्हणे चेहरा बोलका असतो, कसं काय बरं? कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कळत नकळत एक भाव आपोआप उमटत असतो. ईश्वराने किंवा निसर्गाने मानवाला उपजतच एक संजीवनी दिली आहे, ती म्हणजे 'विचार करण्याची क्षमता'. परंतू या क्षमतेचा एक विचित्र पडसाद उमटला गेला आहे माणसाच्या आयुष्यावर, तो म्हणजे अतिविचार. त्यामुळे विचार आणि अतिविचार या दोहोंमुळे माणूस भले कुठल्याही विचारात असो, चालता बोलता त्याचे हावभाव बदलतात. वागण्याच्या, स्वभावाच्या, देहबोलीच्या आणि अंतरंगाच्या किमया बदलतात. माणसाच्या बदलत्या भावना, त्याला आपसूकच बदलत जातात. या भावना आपण रोज जगत असतो, अनुभवत असतो, न्याहाळत असतो. आपल्या स्वतःच्याच काय तर इतरांच्या भावनादेखील आपण तितक्याच मनोभावे जपत असतो आणि ते योग्यही आहे. कारण माणसाचे मन आणि बुद्धी या दोघांचा ताळमेळ राखणे गरजेचे असते. मनातून भावना प्रकट होतात तर बुद्धीद्वारे विचार. विचार आणि भावना या दोघांचा समतोल साधणे अतिशय महत्त्वाचे असते. माणसाच्या मनात कधी कुठची भावना जन्म घेईल आणि डोक्यात कधी कुठला विचार निर्माण होईल, याची शाश्वती कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या आजुबाजूलादेखील अशा कित्येक वेगवेगळ्या प्रकारचे माणसे असतात. प्रत्येक जण डोक्यात एखादा विचार आणि उरात एखादी भावना घेऊन, आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झालेला असतो. या भावनाचं असतात, ज्या माणसाला 'माणूसपण' बहाल करत असतात. अशा अनेक भावना घेऊन आपण जगत असतो, आपल्या मनातील तरल भावना. लेखिका हिमांगी हडवळे-नवले यांनी देखील अशाच त्यांच्या 'तरल' या कथासंग्रहातून अशाच मनमुराद भावनांचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरल..तरल म्हणजे काय असतं हो नेमकं? भौतिकशास्त्रानुसार, तरल म्हणजे असा पदार्थ जो वाहू शकतो, ज्याला निश्चित आकार नसतो, तो ज्या भांड्यात ठेवला जातो, तो त्याचा आकार घेतो. मानवी मनाच्या संदर्भात सांगायचं झाल्यास, 'तरल' म्हणजे अतिसूक्ष्म, अस्थिर, नाजूक किंवा पटकन बदलणारा. काहीतरी जे निश्चित नाही, जे प्रवाही आहे आणि ज्याला लगेच पकडतादेखील येत नाही. अशाच गोष्टींचा, घटनांचा आणि भावनांचा बारकाईने अंदाज घेण्याचा या संग्रहातून प्रयत्न केला आहे. लेखिका हिमांगी हडवळे-नवले यांनी 'तरल' या कथासंग्रहातून मानवी मन आणि भावना समजून घेऊन वाचकांसमोर व्यक्त केलेल्या आहेत. या संग्रहाची सर्वांत सुंदर बाब म्हणजे यातील प्रत्येक कथेतील एक सुप्त भावना. लेखिकेने ती अतिशय प्रभावीपणे वाचकांसमोर मांडली आहे. प्रत्येक कहाणीतून उत्कट होणाऱ्या भावना अतिशय हृदयस्पर्शी आहेत. या केवळ कथा नसून त्या संवेदना आहेत आणि संवेदना या नेहमी जागृत कराव्या लागतात. या कथांच्या माध्यमातून कितीतरी संवेदना जिवंत झाल्याचा अनुभव येतो. या कथांद्वारे लेखिकेने बऱ्याच सुप्त भावनांना मोकळीक निर्माण करून दिली आहे. विविध कहाण्या, घटना, माणसे, प्रसंग, परिस्थिती इ. बारकाईने रचून त्यातील मर्म जाणून घेतले आहे. माणसाच्या मनातील तरल भावना कधीकधी हलक्याशा गुंतागुंतीच्या असतात, ज्या सहजासहजी ओळखता येत नाहीत, व्यक्त करता येत नाहीत. या भावना बऱ्याचदा आपल्या जागरूकतेच्या पलीकडे असतात; परंतू आपल्या विचारांवर, कृतींवर, स्वभावांवर, निर्णयांवर आणि एकूणच अनुभवांवर त्यांचा मोठा प्रभाव पडत असतो. अशाच गोष्टींवर या संग्रहातून अतिशय मार्मिकपणे चित्रण करण्यात आले आहे. 'तरल' या कथासंग्रहात एकूण १५ लहानशा कथा आहेत. प्रत्येक कथेतून एक विशिष्ट भावना व्यक्त होत जाते. या भावना अनेकदा अदृश्य असल्यासारख्या वाटतात, कारण त्याचा चटकन ठाव घेता येत नाही. 'तरल' मधून त्या अलगदपणे दिसू लागतात किंबहुना आपल्याला त्या साफ आणि स्वच्छपणे पाहता येतात. या अव्यक्त, अबोल आणि अदृश्य भावना या कथासंग्रहाच्या केंद्रस्थानी आहेत. या कथा तीव्र नसून, धूसर छटांसारख्या आहेत. काही कथांमधून संमिश्र भावना प्रकट होताना जाणवतात. कारण बऱ्याचदा आपल्यात मनात अनेक भावनांचे मिश्रण तयार होऊन अनाहक गुंतागुंत निर्माण होत जाते. अशा गुंतागुंतींतून माणसांत अनेक बदल घडत जातात, त्यांचादेखील काही कथांमध्ये उल्लेख आढळतो. साधी, सोपी, ओघवती भाषा असल्याने त्यातील आशय समजून घ्यायला आनंद होतो. विशेषतः स्त्रीमनाच्या गाभाऱ्याला उजाळा देण्याचा आशय उत्तम हाताळला आहे. प्रतिकूल शारीरिक आणि मानसिक परिस्थितीतून वाट काढत आयुष्य जगलेल्या स्त्रियांना मानवंदना दिल्यासारखी जाणवते. थोडक्यात, माणसाच्या मनातील तरल भावना म्हणजे आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य घटक आहेत. त्या केवळ आपल्या अनुभवांना खोली देत नाहीत, तर आपल्याला स्वतःला आणि इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतात. या भावनांना स्वीकारणे आणि त्यांना जाणून घेणे हे भावनिक बुद्धिमत्तेचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. 'तरल' या कथासंग्रहातून लेखिका हिमांगी हडवळे-नवले यांनी माणसाच्या भावनिक बुद्धिमत्तेलादेखील एका विशिष्ट पद्धतीने साद घातली आहे. माणसाला जिवंत स्वरूप देणाऱ्या या भावनांना आर्त हाक दिली आहे. प्रत्येक कथेतून वाचकांना एका अचेतन भावनेने गुरफटून गेल्याचा अनुभव येईल. अशी भावना जी आपल्या मनातील दडून राहिलेल्या संवेदना जागृत करण्यासाठी नक्कीच मदत करतील. हा संग्रह केवळ भावनिक विचारांचा नसून 'सामाजिक संवेदनशीलता'  हे त्यामागचे शाश्वत मर्म आहे. त्यामुळे वाचकांना 'तरल' हा संग्रह वाचायला नक्कीच आवडेल याची खात्री आहे. -©ओंकार दिलीप बागल Insta ID - bookbandhu_reviews
सौ.शुभांगी सोनवणे
29/06/2025

ज्यांना हलकंफुलकं, तरीही मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी वाचायला आवडतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक उत्तम आहे. एकदा सुरू केलं की शेवटपर्यंत वाचल्याशिवाय राहवत नाही.
जयवंत पाटील
29/06/2025

शब्दांची पेरणी अतिशय योग्यरित्या केलेली आहे. उत्तम लिखाण आणि पूर्ण वाचून मन प्रसन्न आणि ताजे-तवाने झाले. पुढच्या पुस्तकाची प्रतीक्षा असेल.
Yogesh Katare
29/06/2025

अतिशय सुंदर आणि मनाला थेट गवसणी घालणारा आशय. समर्पक आणि ओघवती लेखन शैली पूर्णत्व देत आहे प्रत्येकाने वाचून संग्रही ठेवावे असे पुस्तक आहे
Harshada Bhondave
23/04/2025

ओघवतं लिखाण, महिलांच्या नाजूक भावना खूप छान रित्या मांडल्या आहेत. संग्रही असावं हे पुस्तक आहे.
Priya Parulekar Chavan
22/04/2025

अप्रतिम,अतिशय सुंदर लिखाण.वाचन प्रेमींसाठी एक अनोखी भेट.नक्की वाचा .
Sarika Revadkar
17/04/2025

छान लिखाणशैली, सगळ्या कथा अत्यंत उत्तमरित्या मांडल्या आहेत. बर्‍याच दिवसांनी एवढे चांगले वाचन करायला मिळाले.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat