Summary of the Book
आपले शिक्षक व मानसकाका क. बा. फाटक यांनी रेव्हरंड टिळकांची शिकवलेली कविता आजही स्मरणात असलेल्या राजीव पवार यांचा हा काव्यसंग्रह इंजिनियर असलेल्या पवार यांनी सारे आयुष्य बांधकामक्षेत्रात घालवले. मात्र लहानपणी शालेय वयात लागलेली कवितेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती देश विदेशात सगळीकडे फिरलेल्या पवार यांचे अनुभवविश्व खूप मोठे आहे. त्यांचा संघर्षही खूप आहे. आपल्या भावना त्यांनी काव्यातून व्यक्त करताना अनेक अनुभव मांडले आहे. अलंकारिक शैलीतील, भारदस्त मराठीची, मागल्या पिढीतील अनेक उत्तम कवितांची आठवण करून देणाऱ्या कविता यामध्ये आहेत.