Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
छत्तीसगड. भारताच्या मध्यभागातील एक राज्य. छत्तीसगड म्हणजे नक्षलवादी आणि सलवा जुडूम. नक्षलवादी ज्या भागात वावरतात, त्याच आदिवासींमधून उभं केलेलं सशस्त्र दल. पण नक्षलवाद्यांइतक्याच सलवा जुडूमच्या कौर्याच्या कहाण्यासुद्धा ऐकायला येत आहेत. एका बाजूला आदिवासींची कड घेत देशाच्या राज्याव्यव्स्थेविरुद्ध शस्त्र उचलणारे नक्षलवादी आणि दुसरीकडे विकासाचा जप करत आदिवासींना त्यांच्या पारंपारिक निवासावरून हुसकावू पहाणारं शासन. यात न्याय, सत्य कोणाच्या बाजूला आहे? या गुंत्यात सापडणारं एक नाव आहे डॉ. बिनायक सेन. सरकार त्यांच्यावर नक्षलवाद्यांना साथ दिल्याचा आरोप करतं. देशभरातले आणि देशाबाहेरचे डॉक्टर, सेवाकार्यकर्ते त्यांना सेवाभावी कार्यकर्ता समजतात. वस्तुस्थिती काय आहे, याचा घेतलेला हा कानोसा. छत्तीसगड नावाच्या कोड्याचा एक कोपरा. सत्य आणि न्याय यांचा शोध घ्यायला डॉ. बिनायक सेन यांनी दिलेल्या लढ्याची कहाणी सहाय्यभूत होईल, असा विश्वास वाटतो.