Summary of the Book
फ्रान्समधील तुलुझ लोत्रेक या प्रख्यात घराण्याच्या वंशाचा दिवा असलेल्या हेन्री ऐन याला एक विचित्र आजार होता. ज्यात त्याच्या कंबरेखालील शरीराची वाढ खुंटते. इतर तरुणांप्रमाणे मौजमजा न करता येणाऱ्या हेन्रीची, चित्रकार बनण्याची इच्छा राजघराण्याच्या लौकिकाला साजेशी नसली तरी हट्टाने तो चित्रकलेचे शिक्षण घेण्याचे ठरवतो. त्यासाठी तो पॅरिसच्या गावकुसाबाहेरील मोंमात्र या वस्तीत राहायला जातो. या ठिकाणी त्याने केलेले पेंटिंग्ज व पोस्टर्सने तुलुझ लोत्रेकला आधुनिक चित्रकलेच्या प्रवाहात स्वतःचे स्थान मिळवून दिले. त्याची लेखक पीएर ल मूर यांनी लिहिलेली मुलाँ रूज हे हृदयस्पर्शी कहाणी. लोत्रेकच्या जीवन कहाणीत मानवी नातेसंबंधाचे उत्कट दर्शन होते. या कादंबरीचे स्वैर रुपांतर जयंत गुणे यांनी केले आहे. त्यांनी या पुस्तकात लोत्रेक यांच्या काही निवडक पेंटींगचा समावेश केला आहे. आणि त्याविषयीची माहिती दिली आहे.