Summary of the Book
अमेरिका आणि कैलास मानसरोवर ही दोन टोकाची ठिकाणे आहेत. एक भौतिकवादाचा आदर्श आहे आणि दुसरा आध्यत्माचा! एक विज्ञान - तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे आणी दुसरा जगण्याचा अर्थ सांगणारा, मोक्षाचा मार्ग दाखविणारा दीपस्तंभ आहे.
विश्वास बर्वे यांनी या दोहोंचा अनुभव घेऊन तो या पुस्तकाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचविला आहे. परदेशवारीत अनुभवलेली पाश्चात्यांची सभ्यता, शिस्त, भौतिक आनंद घेण्याची वृत्ती आणि दुसऱ्या बाजूला मानसरोवर यात्रेत अनुभवलेली यात्रेकरुंची भक्ती त्यांनी शब्दबद्ध केली आहे.
या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात अमेरिकावारीसाठी तयारी, शिकागो, कॅलिफोर्निया प्रवासाची माहिती आहे. दुसऱ्या भागात कैलास मानसरोवर यात्रेला जाण्याचा मार्ग, नेपाळ, कोदारी, कैलास परीक्रमा आदी भाग येतो.