Tu Dhairyachi Asasi Murti - तू धैर्याची अससी मूर्ती
तू धैर्याची अससी मूर्ती
Aitihasik Aparna Chothe Etihas Historical History Mrutyunjay Prakashan Tu Dhairyachi Asasi Murti अपर्णा चोथे इतिहास ऐतिहासिक तू धैर्याची अससी मूर्ती
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Book Review
Write a review

Mrudula Karni
03 May 2021 12 49 PM

तू धैर्याची अससी मूर्ति हे चरित्रात्मक पुस्तक वाचले. भारावून गेले. तिचा त्या तिघी हा एकपात्री प्रयोग पाहूनही भारावले होते. चरित्रात्मक लिहीताना नोंदी, तपशील, पुरावे या बाबी खूप सांभाळाव्या लागतात. त्यासाठीचे सारे श्रम, संदर्भ, संशोधन तिने केले. ती ज्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करते, ते पाहता हे थक्क करणारे आहे. ती येसूवहिनी साकारत असल्यामुळे,भूमिका जगत होती, म्हणून तिला हे लिहीणे, लेखनाचा ओघ, मांडणी हृदयस्पर्शी ठेवणे सुलभ गेले असावे. पुस्तक नुसते ऐतिहासिक दस्तऐवज न होता त्या पलिकडे जाऊन काळजाचा ठाव घेते, प्रेरणा देते. वैयक्तिक संदर्भ सांगायचा तर, माझ्या आईला तिच्या मृत्यूपूर्वी महीनाभर अगोदर मी हे पुस्तक वाचून दाखवले, तिलाही ते भावले. अनेकदा तिचे डोळे पाणावले, ती म्हणाली, "बरं झालं बाई, जगाचा निरोप घेण्यापूर्वी हे पुस्तक वाचलं. येसूवहिनींपेक्षा आमचे जीवन सुखी ग. या मुलीने, अपर्णाने तरुणवयात मोठे धाडस केले. यापेक्षा दाद ती काय. ओघवते, भावपूर्ण कथन शैली, दुर्मिळ फोटो, हस्ताक्षर संदर्भ यामुळे तो काळ जिवंत होतो आणि आपण त्यात हरवून जातो. त्या सुन्न मनस्थितीतून बाहेर पडणं अवघड होते. हेच ते काळजाचा ठाव घेणे.
Swapniil Paatil
21 Apr 2021 10 30 PM

लेखिका अपर्णा चोथे यांचे "तू धैर्याची अससी मूर्ती" हे येसुवहिनींच्या जीवनावर आधारित पुस्तक नुकतेच वाचून झाले. या आधी मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरी काही पुस्तके वाचली आहेत.या मुळे मला येसुवहिनी या सावरकरांच्या मोठ्या वहिनी या पलीकडे फारशी माहिती नव्हती. पण ह्या पुस्तकाच्या माध्यमातून येसुवहिनींचा १०० वर्षांपूर्वीचा त्यांनी केलेला त्याग, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान यांची सविस्तर माहिती वाचण्यास आली. या पुस्तकातील एक मला आवडलेली गोष्ट म्हणजे ऐतिहासिक कागद,पत्रे व काही फोटोग्राफस ही छापले आहेत.या मुळे त्या काळातील अजुन माहिती मिळण्यास मदत होते.अपर्णा यांनी या पुस्तकासाठी केलेला अभ्यास नक्कीच स्पष्टपणे दिसतो. हे पुस्तक वाचताना कुठेही कंटाळवाणे वाटत नाही. यांच बरोबर पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी केलेला विचार ही येसुवहिनींची वेगळी ओळख करून देतो. लेखिका अपर्णा चोथे ह्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.
Aditi Godbole
15 Apr 2021 07 03 PM

अप्रतिम पुस्तक प्रत्येक भारतीय ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काही विशेष वाटतं त्यांनी जरुर वाचावं असं पुस्तक विपरीत परिस्थितीत त्या काळात येसुवहिनींनी केलेली तडजोड, संघर्ष वाचतांना डोळ्यात अक्षरशः पाणी येतं ह्या खऱ्या अर्थानी सहधर्मचारिणी आहेत.आजच्या काळात ह्यांचा आदर्श जरूर ठेवावा आणी पुनश्च: प्रत्येकानी वाचुन संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे.
Ashwini Joshi
11 Apr 2021 02 30 PM

अतिशय अप्रतिम पुस्तक. सखोल व अभ्यासपूर्ण लेखन. १०० वर्षापूर्वीच्या, स्वातंत्र्यपूर्व काळातील स्त्रीचे भावविश्व, समाजरचना, विपरीत परिस्थितीला तोंड देत स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, सर्वच स्फूर्ती देणारे. उत्तम कलाकृती. स्त्री मनाचे दर्शन कादंबरीतून न मांडता संदर्भ चरित्रातून मांडण्याचा सुंदर प्रयत्न. प्रत्येक भारतीयाने वाचावे असे पुस्तक. वंदे मातरम्! सौ. अश्विनी जोशी.
Makrand Kale
11 Apr 2021 01 14 PM

अपर्णा चोथे लिखित, "तू धैर्याची अससी मूर्ती" हे येसुवाहिनींच्या जीवनावर आधारित पुस्तक नुकतेच वाचून झाले. या आधी या व्यक्तिमत्वाची ओळख स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मोठी वहिनी या पलीकडे फारशी नव्हती. पण हे पुस्तक वाचल्यावर मात्र १०० वर्षांपूर्वीच्या काळी त्यांनी केलेला त्याग, समर्पण स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान इत्यादी गोष्टींचा घेतलेला आढावा सप्रमाण ऐतिहासिक कागद पत्रांसाहित घेतलेला दिसला. लेखिकेने त्या साठी केलेला अभ्यास नक्कीच स्पष्टपणे दिसतो. पण लेखनाच्या ओघात ते कुठेही क्लिष्ट किंवा कंटाळवाणे वाटत नाही तर ते प्रसंग आपल्या समोरच घडत आहेत असे वाटते. लेखिकेचे ही रंजक शैली कौतुकास्पद आहे आणि त्यामुळेच हे पुस्तक तरुण पिढीला देखील वाचावेसे वाटेल यात शंका नाही. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या प्रमाणे "अभ्यासोनी प्रकटावे" तसे अपर्णा चोथे हिने केलेला येसुवाहिनींच्या चरित्राचा अभ्यास आणि पुस्तकातून मांडलेले चरित्र निश्चितच स्फूर्तिदायी आहे.
Vaibhav Joshi
09 Apr 2021 06 38 PM

अपर्णा चोथे लिखित सौ. यशोदा गणेश सावरकर तथा येसूवहिनी यांच्यावरील पहिले साधार चरित्र ‘तू धैर्याची अससी मूर्ति’, या पुस्तकाचे वाचन नुकतेच पूर्ण झाले. अतिशय सरळ, साधी व सोपी भाषा आणि प्रत्येक ठिकाणी दिलेले अधिकृत संदर्भ हे या पुस्तकाला एक परिपूर्ण रूप देते. सुमारे 100 वर्षांपूर्वी - स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांचे जीवनमान, येसूवहिनींचा स्वातंत्र्यचळवळीतील सहभाग, याचे सखोल दर्शन या चरित्रातून घडते. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि अनेक क्रांतिकारकांच्या प्रेरणास्थान असलेल्या येसूवहिनीचे दर्शन या चरित्रातून घडते. येसूवहिनींच्या या चरित्रातून त्यांच्या जीवनाशी निगडित अनेक अपरिचित किंवा प्रकाशझोतात नसलेल्या गोष्टी वाचकांना वाचायला मिळतात. अप्रतिम कलाकृती! प्रत्येक भारतीयाने वाचावे असे चरित्र. लेखिकेस अनेक शुभेच्छा..!! वंदे मातरम्.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat