Summary of the Book
कीर्तन हि भारतातील प्राचीन परंपरा आहे. काही वर्षांपूर्वी कीर्तनाला शैक्षणिक दर्जा मिळाला. उच्च शिक्षणात शास्त्र म्हणून याचा समावेश झाला आणि मंदिरातील हि कला तरुणही आत्मसात करू लागले. महाराष्ट्रातही अनेक कीर्तन महाविद्यालयेसुरु झाली. उत्तोमोत्तम कीर्तनकारांची परंपरा यामुळे अखंड सुरु राहिली. यातीलच एक नाव म्हणजे सुमन चौधरी. पेशाने शिक्षक असलेल्या चौधरी यांनी कीर्तनाचे धडे गिरवले आणि नंतर दहा वर्षे त्या कीर्तनसेवेत रमल्या.
राज्य व राज्याबाहेर त्यांनी ७० कीर्तने केली. त्यातील निवडक चौदा कीर्तनांचा समावेश 'निवडक कीर्तन सुमनांजली' मध्ये केला आहे. पूर्वरंग व आख्यान यातून 'गणेशमहिमा', 'संतमहिमा', 'पंढरीमहात्म्य' या बरोबरच 'राणी दुर्गावती', 'कीचकवध', 'भक्त त्यागराज' अशा चाकोराबाहेरील आख्यानेही यात आहेत. यातून स्वदेश, स्वधर्म,भारतीय संस्कृती प्रतिबिंबित होते.