Summary of the Book
निरनिराळ्या प्रकारचे अपघात नेहमी घडत असतात. अशा वेळी रोग्यास आराम वाटेल व त्याची इजा विकोपाला न जाईल असे काही इलाज आपण त्वरित अमलात आणले पाहिजेत. अपघातावर कोणते प्रथमोपचार करायचे याचे ज्ञान प्रत्येकास असले पाहिजे. आपल्या शरिराची रचना कशी आहे, निरनिराळे अपघात कसे होतात व ते कसे ओळखावे, त्यावर प्रथमोपचार कोणते करावे, प्रथमोपचारातील प्रत्येक गोष्ट कोणत्या कारणासाठी करावयाची याची तपशीलवार माहिती असली म्हणजेच विषयांचे सांगोपांग ज्ञान होऊ शकते. सर्वसाधारण माणसास हे ज्ञान व्हावे ह्या उद्देशानेच हे पुस्तक प्रकाशित केले आहे.