Summary of the Book
वास्तुकलेचा एक शास्त्र म्हणून अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून नक्कीच उपयोग होईल, पण त्यापेक्षाही जास्त उपयोग जिज्ञासू वाचकांना होईल. आचवलांचा लेख वाचल्यावर जसा ताजमहालाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो, अगदी तसंच हे पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येक वास्तूचं सौंदर्य नेमकं कशात आहे आणि ते कशात शोधलं पाहिजे याची दृष्टी काही प्रमाणात तरी आत्मसात करता येईल, असं वाटतं.