Summary of the Book
मनुष्य जन्माची पहिली हालचाल ही व्यायामाची सुरुवात होय, असे म्हटले जाते. प्रस्तुतचा `शारीरिक शिक्षणाचा इतिहास’ हा ग्रंथ संशोधनात्मक असून, त्यात वेदकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत शारीरिक शिक्षणाच्या क्षेत्रात कसकसे बदल व सुधारणा होत गेल्या, त्याचा नेटका आढावा घेतलेला आहे.
प्रस्तुत पुस्तकाचे लेखक श्री. गो. ना. पुरंदरे यांनी खेळाडू म्हणून देशी व परदेशी खेळात प्राविण्य मिळविले आहे. तसेच हेलसिंकी येथील 1952 साली भरलेल्या ऑलिंपिकमध्ये कुस्तीमधील ब्रॉंझ पदक मिळवून देणार्या कै. खाशाबा जाधव यांचे प्रशिक्षणही गो. ना. पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले होते.
भारताची व्यायाम परंपरा, त्यांची वैशिष्ट्ये व फायदे, मल्लविद्या, आसन-प्राणायाम, मल्लखांबाचे स्थान, लेझिम आदी विविध व्यायाम प्रकारांचा यामध्ये घेतलेला मागोवा या विषयाचे प्रशिक्षक, शिक्षणसंस्था व व्यायामपटू यांना निश्र्चितच उपयुक्त ठरेल.