Summary of the Book
अलिकडील काळात सर्कस हाडाच्या प्रकार खूप कमी झाला आहे. आता जत्रा अथवा शाळेच्या सुट्टीच्या दिवसांतच सर्कस पाहायला मिळते. मात्र, सर्कस ही एक निर्भेळ करमणूक असते. शारीरिक कौशल्याचे प्रदर्शन करण्याचा एक खेल असतो. खरे तर हा एक चित्तथरारक अनुभव असतो. हा अनुभव श्यामला शिरोळकर यांनी या पुस्तकातून आपल्याला करून दिला आहे. या पुस्तकात त्यांनी भारतीय सर्कशीप्रमाणेच परदेशातील सर्काशींची विस्तृत माहिती दिली आहे. प्रारंभी त्यांनी भारतातील सर्कशीचा इतिहास सांगितला आहे.
ऋग्वेद काळातील रथांचा शर्यतींचा त्या आढावा घेतात. इजिप्तमधील सर्कशीच्या गमतीजमती दुसऱ्या प्रकरणात समजतात. अमेरिकेच्या सर्कशींचा इतिहास विस्ताराने सांगितला आहे. फेंच, रशियन, जर्मन सर्कशींची माहिती स्वतंत्र प्रकरणांमधून दिली आहे. सर्कशीतील विदुषकांचे महत्व आणि अविभाज्य अंग असलेले प्राणिविश्व यांवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.