माणसाच्या ऐहिक सुखाची गोष्ट
Pages: 352
Weight: 428 Gm
Binding:
Paperback
ISBN13: 9789380700656
eBook Price:
20% OFF
R 200
R
160
/ $
2.05
Buy eBook
Add to Cart
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
या पुस्तकाचे उद्दिष्ट दुहेरी आहे. अर्थशास्त्रीय सिद्धांतांच्या साहाय्याने इतिहास आणि इतिहासाच्या साहाय्याने अर्थशास्त्रीय सिद्धांत विशद करणे, असा हा दुहेरी प्रयत्न आहे. या दोन्ही गोष्टींची सांगड घालणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे.
आर्थिक बाजूकडे फारसे लक्ष दिले नाही, तर इतिहासाचे आकलन तोकडे होते आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून विलग केलेले अर्थशास्त्रीय सिद्धांत कंटाळवाणे बनतात. जोपर्यंत इतिहासाच्या प्रकाशझोतात हे ‘कंटाळवाणे विज्ञान’ शिकले आणि शिकविले जात नाही, तोपर्यंत ते कंटाळवाणेच राहील.
रिकाडरे याचा खंडविषयक नियम समजण्यास कठीण आणि कंटाळवाणा आहे; परंतु त्याला इतिहासाची पार्श्वभूमी द्या. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस चाललेला, जमीनमालक आणि उद्योगपती यांच्यातील एक संघर्ष म्हणून त्याच्याकडे पाहा. मग तोच नियम अर्थपूर्ण बनतो आणि विचारशक्ती चेतवतो.
हे पुस्तक सर्वसमावेशक आहे, असा माझा दावा नाही. हा केवळ आर्थिक इतिहास नव्हे किंवा अर्थशास्त्रीय सिद्धांताचा इतिहासही नव्हे - या दोन्हीपैकी थोडे-थोडे आहे. विशिष्ट प्रकारचे सिद्धांत विशिष्ट काळात का निर्माण झाले, समाजमानवाच्या हाडामांसातून त्यांचा जन्म कसा झाला आणि त्याला हाडामांसाची संरचना बदलू लागल्यावर त्या सिद्धांतामध्ये विकास, बदल व अंत हे टप्पे कस कसे आले हे आर्थिक संस्थांच्या विकास प्रक्रियेमधून स्पष्ट करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
लिओ ह्युबरमॅन