Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
तळागाळातील बहिष्कृत समाजाला आत्मविश्वास आणि संघर्षांची प्रेरणा देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्पृश्यता निवारणापासून शिक्षणापर्यंतचे कार्य महाराष्ट्राला आणि भारताला नव्याने सांगण्याची गरज नाही. डॉ. आंबेडकरांच्या या कार्यात मोलाचा वाटा उचलणारे अनेक सहकारी होते. त्यातील एक म्हणजे दादासाहेब गायकवाड. त्यांनी आंबेडकरांच्या पश्चातही त्यांच्या कार्याचा वारसा आपल्यापरीने पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. त्या वारशाचा आणि दादासाहेबांची कर्तृत्वाचा आलेख या पुस्तकात वाचायला मिळतो.
चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळामंदिर प्रवेश सत्याग्रह, मुंबई विधिमंडळातील कार्य, भूमिहीनांचे सत्याग्रह, धर्मातर व धर्मप्रचार, राजकीय पक्ष-संसदेतील कार्य असे प्रकरणनिहाय दादासाहेबांच्या कार्याचा आढावा लेखकाने घेतला आहे. या प्रकरणांवरूनच त्यांच्या कार्याचा आवाका लक्षात येतो. आंबेडकरी चळवळीतील दादासाहेबांच्या योगदानाचा तपशीलवार आढावा लेखकाने घेतला आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेला आणि एकंदरच समाजाला या पुस्तकातून चळवळीच्या आणि जीवनध्येयाच्या प्रेरणा जाणून घ्यायला मदत होईल.