Raju Kasambe
28 Dec 2018 11 42 AM
श्री दिलीप विरखेडे, वर्धा ह्यांची प्रतिक्रिया: भाग-१
मायाळू धनेशाचे गुपित..
कराड ते वर्धा रेल्वेच्या दीर्घ प्रवासातील गप्पांचा पहिला भर ओसरला,मी हळूच 'मायाळू धनेशाचे गुपित' हे कोरं-करकरित पुस्तक काढलं आणि वाचायला लागलो. वाचलेल्या महत्त्वाच्या भागाच्या रवंथ करण्याच्या सवयीमुळे शेवटचे काही राहिलेले प्रकरणं घरी वाचून संपविले...अनेक पक्ष्यांवर सर्वसाधारण लिहिण्यापेक्षा एकाच पक्ष्यावर लिहिणे आणि तेही संशोधनात्मक लिहिणे यात लेखकाचा कस लागतो.प्रचंड चिकाटी आणि निरिक्षणातील सातत्यच पक्षीजीवनातील गुपितांचा उलगडा करू शकतं. दीर्घ संशोधनातून भारतीय राखी धनेशाचा समग्र जीवनपट उलगडल्याबद्दल डाॅ.राजू कसंबे यांचं अभिनंदन! संशोधनात्मक प्रबंध हा बहुधा तीन प्रतितच राहतो!-तसे न राहता निसर्गप्रेमिंना 'धनेश' वाचायला दिल्याबद्दल पुनः अभिनंदन!!
भाग-१