Summary of the Book
सर्वसामान्य जनतेसाठी शासन अनेक योजना राबवत असते. विविध विभागांसाठी जसे व्यावसायिक विभाग, शैक्षणिक,आरोग्य, सामाजिक विकास, महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास, बाल विकास, सामुहिक विकास, कृषी विकास, ग्रामीण विकास, वैयक्तिक लाभ, भूमी अभिलेख, पशुसंवर्धन, क्रीडा विषयक व इतरही अनेक, लोककल्याणकारी योजना आखल्या गेल्या आहेत.
परंतु सर्वसाधारण असे लक्षात येते की या योजना तय व्यक्तींपर्यंत पोहचवण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. या पुस्तकात २५० योजनाच्या माहितीचे संकलन केले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गरजू व्यक्ती योजनांचा लाभ घेऊ शकतील असा विश्वास वाटतो.
सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.
गरिबांसाठी सामाजिक काम करणाऱ्या संस्थानाही विविध सरकारी योजनांची एकत्रित माहिती अत्यंत मोलाची ठरेल असे ठामपणे वाटते.
या पुस्तकांमुळे काही व्यक्तींना जरी योजनांचा लाभ घेता आला तरी या पुस्तकाचा हेतू सफल झाल्याचे समाधान मिळेल अशी आमची सद्भावना आहे.