Summary of the Book
लेखकाने आपल्या विशिष्ट शैलीत केलेले हे प्रवासवर्णन वाचकांना खिळवून ठेवते.
भारताच्या नकाशावर अंदमान आणि निकोबार या बेटांचा आकार मोठा विचित्र आहे. मधमाश्यांची पोवळी लोंबत सोडल्यासारखी दिसणारी ती बेटे. त्यांच्या तिन्ही बाजूंनी आकाश उपटून आणून पसरल्यासारखा तो. निळा समुद्र .... मुलांच्या खेळातील दगड धोंड्याप्रमाणे हजारो कि. मी. लांबीचे मातीचे उंचवटे. प्रचंड जलराशीतली एखादी महाकाय लाट उसळली की त्यात विरघळून जातील असे वाटायला लावणारे हे अद्भूत सौंदर्य कसे काय टिकून राहिले आहे याचे आश्चर्य वाटते. मोठ्या देशाचा सहवासच नको म्हणून शहाणपणाने समुद्राचा आसरा घेणारी ती बेटे पाहणाऱ्यांच्या मनात आदरभाव निर्माण करतात. कन्नड विद्यापीठात सेवारत असलेल्या रहमत तरीकरे यांची 'धर्मपरीक्षा' आणि 'कर्दळी वनात जाऊन आलो' हि पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.