Summary of the Book
' साद ' हा माझा चौथा काव्यसंग्रह आपल्या हाती सोपवताना मला मनापासून आनंद होतो आहे , कारण माझ्या दृष्टीने विचार समाजासमोर मांडण्याचे कविता हे महत्वाचे मध्यम आहे .
निसर्गाची ओढ , सामाजिक जाणीव , विनोदाची विविध रूपे , मराठी भाषा आणि संस्कृती याबद्दल वाटणारा सार्थ अभिमान आणि अवघे जीवन व्यापणारे प्रेम , हे माझ्या जिव्हाळ्याचे विषय . सहाजिकच यातील बहुतांशी कविता या विषयांभोवती फिरणाऱ्या आहेत. त्यामध्ये कधी अंतर्मनाला , कधी ईश्वराला , कधी सखीला तर कधी माणसाच्या सदसद्विवेकबुद्धीला साद घातली आहे .
मराठी भाषा आणि संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या मला , भाषेची नाळ तुटली की संस्कृतीशीही नाते तुटते , असे प्रामाणिकपणे वाटते . तसे ते तुटू नये म्हणून आपण सर्वानीच जमेल तसे प्रामाणिक प्रयत्न , सातत्याने केले पाहिजेत ; तर आणि तरच आपल्या संपन्न मातृभाषेचा आणि संस्कृतीचा वारसा आपण पुढच्या पिढ्यांना देऊ शकू . मातृभाषेच्या संगोपन आणि संवर्धनासाठी , मी साद घालतो आहे! आपण त्यास निश्चितच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे .
कवी नेहमी त्याच्या कवितेतून बोलत असतो , साद घालत असतो . आपल्याला कविता कशा वाटल्या , हे आपल्यासारख्या सुजन वाचकांकडून मला कळावे ही इच्छा ...