Summary of the Book
खाकी वर्दी आणि गुलाब या दोन्ही गोष्टी हल्लीच्या काळात एकत्र पाहायला मिळणं दुरापास्त मानलं जातं. यात बऱ्याच अंशी तथ्य आहे. पोलीस दलातील व्यक्ती नागरिकांशी ज्या पद्धतीने वर्तन करतात, त्यांची ज्या पद्धतीने दखल घेतात, त्यावरून ही प्रतिमा तयार झाली आहे. पण याला काही अपवादही आहेत. संजीव कोकीळ हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशांपैकीच एक. शिवाय ते कवीही आहेत. संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा या दोन्ही गोष्टी त्यांच्या 'खाकी गुलाब' या काव्यसंग्रहात अनुभवायला मिळतात. कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची या काव्यसंग्रहाला छोटाशी प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी त्यात लिहिले आहे- 'जीवनातल्या विविध अनुभवांना स्पर्श करीत संजीव कोकीळ यांची कविता निर्मितीच्या प्रवासाला निघाली आहे.' पाडगांवकरांच्या या अभिप्रायातून या काव्यसंग्रहाचे यथार्थ वर्णन आले आहे.