Summary of the Book
नृत्यकला ही ६४ कलांमधील आयुष्य समृद्ध करणारी एक कला आहे. नृत्यलंकार वृषाली शशांक दाबके यांनी कथ्थक नृत्य कलाकारांच्या कलेवर आधारित माहिती देणारे लेखन केले आहे. पुस्तकाच्या प्रारंभी दाबके यांनी आपली आई व गुरु मंजिरी वैद्य यांच्याकडून घेतलेला कलेचा वारसा कथन केला आहे. त्यानंतर एकूण संगीत परिचयाचा एक विभाग आहे.
दुसऱ्या विभागात दाबके यांनी या पुस्तकात कथ्थकबद्दल खूप बारीकसारीक माहिती दिली आहे. कथ्थक नृत्याच्या साथसंगतीकरिता वापरली जाणारी वाद्ये, विविध संज्ञाविषयी समजते. तिसरा विभाग हा प्रवेशिका परीक्षेच्या द्रुष्टीने तयारी करून घेणारा आहे. याबरोबरच कथ्थकचा इतिहास, शास्त्रीय नृत्य कलाकार, वादक आणि गायक व संगीततज्ज्ञ या स्वतंत्र विभागांमधून संबंधित कलाकारांची माहिती दिली आहे. पुस्तकासोबत उदाहरणादाखल 'सीडी' देण्यात आली आहे.