Summary of the Book
पत्रकार अजय सोनावणे यांनी या पुस्तकात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या रामलीला मैदानावरील तेरा दिवसांच्या उपोषणाची तपशीलवार माहिती दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले अरविंद केजरीवाल यांची या आंदोलनाच्या काळातील भूमिका कशी होती ते इथे वाचायला मिळते. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या पलीकडे त्या तेरा दिवसांत काय काय घडले ते सगळे या पुस्तकात आहे. केजरीवाल यांच्या यशात त्या आंदोलनाचा किती मोठा वाटा होता तेही लक्षात येते. अण्णांच्या बरोबरीनं अनेक जण उपोषण करत होते. त्याचीही सविस्तर दखल त्यांनी या पुस्तकात घेतली आहे.