Summary of the Book
भारत स्वतंत्र होऊन साठी उलटली तरी भारतीय जनता जातिवादातून पूर्णपणे बाहेर पडलेली नाही. ग्रामीण भागात जातीयता प्रखरतेने जाणवते. दलित, गरीब, अडाणी जनतेची सवर्णांकडून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना वारंवार घडतात. जातिव्यवस्थेने ग्रामीण जीवनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
त्याचे वास्तव दीपध्वज कासोदे यांनी ‘पंचनामा’तून पुढे आणले आहे. यातील प्रत्येक कथांमधून गावगाडा व जातिव्यवस्था यांच्यातील संघर्ष दिसतो. जातिव्यवस्थेत भरडलेल्या माणसांच्या कथा यात आहेत. दलित समाजातील नवी पिढी शिकलेली आहे. कायदे, अधिकार यांच्या मदतीने ते अन्यायाविरुद्ध लढा उभारतात.
अनेकदा त्यांना अपयश येते, पण त्यातून येणार्या हतबलतेतून ते पुन्हा उभे राहू शकतात. याचे चित्रण या खानदेशी पार्श्वभूमी लाभलेल्या कथांमध्ये दिसते. तेथील जनजीवनात वापरली जाणार्या भाषा कथेतील पात्र बोलत असल्याने त्यात सच्चेपणा आहे.