Summary of the Book
वैशाली शिंदे हिला लग्नानंतर भीषण वास्तवाला सामोरे जावे लागले. तिचा पती एच.आय.व्ही. बाधित होता आणि ती एच.आय.व्ही. संक्रमित झाली. त्यानंतर, तीचं निरागस मूल जन्मत:च मरण पावलं. त्यामुळे तिच्या जीवनात कटूता निर्माण झाली, तरीही तिने निर्धाराने त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देत एच.आय.व्ही. संबधी जनजागृती करायला सुरुवात केली.
एच.आय.व्ही. सारख्या ज्वलंत विषयावर गावागावात जाऊन लोकांशी चर्चा आणि प्रबोधन करण्यासाठी तिने आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, अशा खंबीर महिलेचे हे आत्म कथन आहे.