Summary of the Book
नर्मदा परिक्रमा करणाऱ्या मंडळींची संख्या आता वाढत आहे. पुण्यातील गंगाधर कुलकर्णी यांनी नर्मदा परिक्रमा करून आपल्याला आलेले अनुभव विस्ताराने मांडले आहेत. भूशास्त्रज्ञ असलेल्या कुलकर्णी यांची ही परिक्रमा पूर्ण करताना कसोटी लागली. निवृत्तीनंतर त्यांनी केलेल्या या यात्रेत त्यांना विलक्षण अनुभव आले. असंख्य अडचणी येऊनही त्यांनी निष्ठेने ही परिक्रमा पूर्ण केली. मानवी स्वभावाचे अनेक नमुने त्यांना पाहायला मिळाले. कुठेही तक्रारीचा सूर न लावता त्यांनी हे अनुभवकथन केलं आहे.