Summary of the Book
भारत-पाक संबंध हा भारतीय लोकांचा अतिशय कुतूहलाचा विषय आहे. पाकिस्तानच्या आयएसआयचा प्रसार, दहशतवादाचा उद्रेक, दिवसेंदिवस अधिक शक्तिमान होत जाणारी ही संस्था, तिचं सतत व्यापकपणे पसरत जाणारं जाळं, याबद्दल अतिशय सखोल माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल. आयएसआय लष्करांतर्गत असलेलं लष्कर, शासनांतर्गत असलेलं शासन, राज्यांतर्गत असलेलं राज्य अशा आयएसआयने इतर ठिकाणी आणि विशेषत: भारतामध्ये खुपसलेली विषारी नखे, अमेरिकेची गुप्तचर संस्था आणि आयएसआय यांचं साटंलोटं... राजकीय पडद्याआडून आयएसआयच्या कारवाया कशा चालतात हे वाचताना कुणीही चकित होईल असे हे पुस्तक.