Summary of the Book
'नव्या युगातील नांदि ... आदि ! अत्याचार करून टाकले तुला, राखरांगोळी केली तुझी, पण राखेतून स्फुल्लिंग पेटले ...' स्त्रीचे आदिरूप दाखवणारे लेखन सुलभा गाडगीळ यांनी केले आहे. त्यांनी लिहिलेल्या नायिकाकेंद्रित कथांचा हा संग्रह आहे. ' आक्रोश' या कथेत रेल्वेतून जाणाऱ्या मुलीवर अत्याचार करू पाहणाऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न करणारी धाडसी म्हातारी,
'काठावरच बसून' मधील सुखाच्या आयुष्याला बोअर झालेली नायिका एकीकडे आणि दुसरीकडे परिस्थितीशी झगडतानाही आयुष्याची मौज लुटणारी संगीता, पती नसल्याने कर्तुत्वान स्त्रीलाही समाजात मन मिळत नाही हे दाखवणारी 'काहीही ...'मधील नायिका असा अनेक कथा संग्रहात वाचाय्याला मिळतात.'मुलगी झाली हो' हा मुलीच्या जन्माची थोरवी सांगणारा लेख आहे. एकूणच स्त्रीची विविध रूपे दाखवताना तिच्या वाट्याला आलेल्या भोगाचेही दर्शन या लेखनातून घडते.