Summary of the Book
पं. जवाहरलाल नेहरूंच्या जन्मशताब्दीनिमित्त मत्तम मंडळाने त्यांना या ग्रंथाच्या रूपाने वाहिलेली ही आदरांजली आहे. पं. नेहरू हे तांत्रिक अर्थाने तत्त्वज्ञ नव्हतेच, पण त्यांचा पिंड तत्त्वचिन्तकासारखा होता. जीवनाचे समग्र दर्शन घेण्याची, त्याचा व्यापक दृष्टीने अर्थ लावण्याची व ते सम्यक् रीतीने समजावून घेण्याची त्यांना आवड होती. तुरुंगवासात त्यांना मिळालेल्या एकान्तात ते विश्र्वाच्या, जगाच्या, समाजाच्या व एकूण जीवनाच्या विविध अंगांचा सखोल, तर्कशुद्ध व मूलगामी विचार करून त्यांचे विश्र्लेषण व विवरण करीत असत. त्यांचे ते विचारमंथन या पुस्तकात व्यक्त झालेले सापडले.
या पुस्तकात सामाजिक जीवन, राजकारण, अर्थकारण, धर्म, नीती, तत्त्वज्ञान, संस्कृती, परंपरा, नवसमाजरचना, क्रान्ती, सत्य, अहिंसा, स्वातंत्र्य, समता, न्याय, समाजवाद, सर्वधर्मसमभाव, निसर्ग, पर्यावरण, मानवी मनाच्या विविध प्रक्रिया व जीवनाचे उदात्त आदर्श यांविषयी नेहरूचे मौलिक विचार वाचावयास मिळतील, आणि त्यांतून पंडिताजींच्या उत्तुंग, मूलगामी व मर्मग्राही तत्त्वचिन्तनाची झलक पाहावयास मिळेल.