Summary of the Book
मानवी मेंदूची कामगिरी थक्क करणारी आहे. शरीरातील एकही कार्य असे नाही की ज्यावर मेंदूचे नियंत्रण नसते. मेंदूच्या कार्यामधील अनेक गूढ गोष्टी शास्त्र्ज्ञांनाही स्तंभित करतात. मेंदूचा अभ्यास हे एक आव्हान आहे. मेंदू आणि माणसाचे वर्तन यावर प्रकाश टाकणार्या पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. डॉ. सुनील पंड्या व डॉ. निखिल शहा या डॉक्टरद्वयीने लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ.प्रमोद जोगळेकर यांनी केला आहे.