Summary of the Book
कोकणातला निसर्ग, तिथं रमणारं काव्यमन आणि मुंबईच्या बकाल वस्तीतलं शहरी जीवन यातले संदर्भ शोधणाऱ्या या कविता हे या कवीचं महत्त्वाचं संचित आहे. त्यामुळेच ते संवेदनशील आहे. स्वतःच्या सुखदुःखात अवघ्या निसर्गाचं भान असणाऱ्या प्रतिमा या काव्यसंग्रहात पदोपदी आढळतात. म्हणूनच हा कवितासंग्रह कोकणच्या अस्सल तांबड्या मातीतून जन्मल्यासारखा वाटतो, तसाच मुंबईत स्थिरावल्यावर आपल्या चाकरमानी विवंचना मांडणाराही वाटतो.