Hard Copy Price:
25% OFF R 130R 98
/ $
1.26
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
हल्लीची मुले अत्यंत सजग व हुशार असतात. पालकही त्यांचे व्यक्तिमत्व घडविण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात. प्रत्येक मूल हे वेगळे असते, हे आई वडिलांनी प्रथम लक्षात घेतले पाहिजे. यातून तुलना न करता यांच्यावर योग्य संस्कार करणे आवश्यक ठरते.
त्यांचे व्यक्तिमत्व फुलविताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे, हे शामल वेलचेकर यांनी 'आपल्या मुलाचे प्रगल्भ व्यक्तीमत्व घडवताना...' मधून सांगितले आहे. मुलांना वळण लावताना त्याच्यातील चांगले-वाईट गुण शोधून मार्ग दाखवायला हवा.
मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, अपयश पचविण्याची ताकद निर्माण करणे, मुलांची वर्तणूक सुधारणे, चारचौघांत वागण्याचे; तसेच स्वच्छतेचे धडे, निरोगी आरोग्याचे महत्व, योग्य सवयी लावण्याची गरज, व्यवहार ज्ञान शिकवणे, प्रोत्साहनाची गरज, सहवास देणे, संवाद साधणे, भाषेचे वळण, त्यांची जिज्ञासू वृत्ती जोपासणे, अति कौतुक टाळणे, आर्थिक परिस्थितीची जाणीव देणे, मुलांना खेळणी, पैसा देताना कशी काळजी घ्यावी, अभ्यासाचे महत्व सांगणे अशा अनेक गोष्टी उदाहरणांसह स्पष्ट करून मुलांना कसे घडवावे, याविषयी यात मार्गदर्शन केले आहे.