Summary of the Book
क्रिकेट-जगतातील सर्वश्रेष्ठ म्हणून सर्वज्ञात असलेल्या डॉन ब्रॅडमन यांचं क्रिकेट-कलेबाबत मार्गदर्शन करणारं बहुमूल्य पुस्तक.
''हा महान खेळ खेळण्याची सर्वोत्तम पध्दत कशी असावी आणि हा खेळ सर्वाधिक परिणामकारकतेने कसा खेळता येईल, याबाबत माझ्या काही कल्पना आहेत. ज्या पध्दती मला अगदी मनापासून योग्य वाटतात, अशाच पध्दतींचा मी या पुस्तकातून पुरस्कार केला आहे. मी खेळताना शक्यतो याच पध्दतींचा शंभर टक्के अवलंब करतो.या पुस्तकात तुम्हाला या खेळाबाबतची कोणतीही क्लिष्ट अशी वैज्ञानिक स्पष्टीकरणं आढळणार नाहीत. मी जाणिवपूर्वक तसं करणं टाळलं आहे. क्रिकेटबाबतच्या कोणत्याही पाठयपुस्तकात सांगितलेल्या गोष्टींपेक्षा सहसा खेळाडूचा व्यावहारिक 'कॉमन सेन्स'च अधिक परिणामकारक ठरतो.''
-डॉन ब्रॅडमन
विशेष वैशिष्टय : डॉन ब्रॅडमन यांच्या मूळ 'स्टॉप-मोशन' स्थिचित्रांचा समावेश
या पुस्तकाची विशेष वैशिष्टयं
* डॉन ब्रॅडमन यांच्या मूळ 'स्टॉप-मोशन' स्थिरचित्रांचा समावेश
* परिणामकारक फलंदाजीसाठी योग्य पवित्रा कसा घ्यावा ते विविध फटके कसे मारावे याबाबत मार्गदर्शन
* गोलंदाजी, फलंदाजी, रनिंग बिटवीन द विकेट्स, क्षेत्ररक्षण व अंपायरिंग सर्वच बाबतीत महत्त्वपूर्ण सूचना
* अभिजात तंत्राबाबत बहारदार शैलीत मार्गदर्शन