Summary of the Book
डॉ.अशोक दा. रानडे यांच्या लिखाणातून वाचकाला नेहमीच संगीताबद्दलची नवी नजर मिळते. संगीतातील सृजनप्रक्रियेपासून सादरीकरणापर्यंत अनेकविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या लेखांचे निवडक संकलन म्हणजे हा ग्रंथ. शास्त्रोक्त संगीत, विविध संगीत - परंपरा, नाट्यसंगीत, भावगीत - गायन, संगीतातील साहित्यिक अंग अशा विविध विषयांची मार्मिक मांडणी हे या ग्रंथाचे आगळे वैशिष्ट्य. जयदेव - बैजू - होनाजी अशा इतिहासातून डोकावणाऱ्या कलाकारांपासून रवींद्रनाथ टागोर, गजाजनबुवा जोशी, सुब्बलक्ष्मी ते लता मंगेशकर अन आशा भोसले अशा कित्येक कलाकारांशी डॉ. रानडे वाचकाचे अलगद बोट धरून भेट घडवतात. डॉ. रानड्यांची रसाळ, नर्मविनोदी शैली आणि अनेक किस्से अन चुटके यांनी नटलेले हे संगीतविचार प्रवर्तक लिखाण वाचकाला एखाद्या कथा - कादंबरीसारखे गुंतवून ठेवील. मैफिलीत पेशकश करणाऱ्या कलाकारांनी, संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि आस्वादक व अभ्यासक संगीतरसिकांनी संगीतकलेच्या व्यापकतेचे भान येण्यासाठीआवर्जून वाचायलाच हवा.