Summary of the Book
अंबा ! महर्षी व्यासांच्या लेखणीतून साकारलेली पण आजच्या स्त्रीमुक्ती आंदोलनाची जननीच वाटावी अशी एक महाभारतकालीन व्यक्तिरेखा. अनादी कालापासून चालत आलेल्या पुरुषप्रधान समाजरचनेविरुद्ध बंडाचे निशाण फडकवणारी एक दैदिप्यमान स्त्री!
भीष्म, शाल्व व काशीराजे या तीन पुरुषांकडून समाजात अवमानित झालेली अंबा सुडाने पेटली. अन्यायाचा प्रतिकार करीत असतानाच, त्याला सर्वस्वी कारणीभूत असलेल्या भीष्मासारख्या अजेयाचा वध करण्यासाठी तिने उग्र तपाचरण केले. अंबेच्या एकाकी जीवनातली प्रखर झुंज अधिक उत्तुंग आहे. अंबा ह्या व्यक्तिरेखेच्या संपूर्ण जीवनप्रवासात दु:खाची – वेदनेची अनुभूती असली तरी सांस्कृतिक क्षेत्रात या व्यक्तिमत्त्वाला कमालीची कलात्मक उंची आहे. आजच्या स्त्री स्वातंत्र्याच्या ऊर्मी व जाणीवा जागवणार्या समाजात ती खचितच आदर्श ठरते.