Summary of the Book
`संकटाशी दोन हात करण्याची प्रेरणा देणा-या कथांमध्ये ही कथा जितकी जास्त प्रेरक तितकीच अधिक शोकात्म आहे.' - न्यूज ऑफ द वल्र्ड स्कॅट ग्रॅहॅम एक कसलेला `एसएएस' (स्पेशल एअर सर्हिस) सौनिक होता. उत्तर आयलंड आणि फॉकलंड मोहिमेबद्दल त्याला शौर्यपदक मिळालं होतं. `आयआरए'बरोबरच्या चकमकीत त्यानं कित्येक अतिरेक्यांना कंठस्नान घातलं होतं. मायरीड फॅरेल ही `आयआरए'साठी बाँब पेरणारी एक लहानखुरी पण नितांत सुंदर तरुणी! या दोघांचं जीवघेणं आणि भयानक असं एक गुपित होतं. आपल्या पक्षाच्या आणि सौन्याच्या नियमांना बगल देत अनेक वष| ते एकमेकांवर उत्कट प्रेम करत राहिले. `आयआरए'च्या तीन नि:शस्त्र अतिरेक्यांना रॉक ऑफ जिब्राल्टरवर गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि सॅट आणि मायरीडच्या छुप्या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला. `एसएएस'च्या इतिहासातला तो एक अतिशय वादग्रस्त प्रसंग ठरला. स्कॉट ग्रॅहॅमच्या असाधारण प्रेमाचं आणि जगाला हादरवून सोडणा-या तीन हत्यांचं चित्तथरारक सत्यकथन - `शूट टू किल.'