Anand Lonkar
27 Feb 2015 09 57 PM
very good poems
शामकांत -
27 May 2014 10 17 PM
घुसमट मधील काही कविता शालेय अभुअस्क्रमत घेता येतात का हे शिक्षण मंडलालीत लोकांनी पाहावे. घुसमट मधील कविता हया अनेक सामाजिक व राजकीय सामाश्यावर रामबन उपाय आहेत असे मला वाटते.
Durgesh Sonar - Buldhana
27 May 2014 10 14 PM
घुसमट मधी कविता म्हणजे अगदी बावनकशी सोन... कवी चीपरगे यांचा अन्य काव्य संग्रह असल्या कोठे मिळेल?
somnath kamble - Chandrapur
27 May 2014 10 12 PM
इतक्या चांगल्या कविता मी कधीच वाचल्या नव्हत्या, हा एक झाकला कवी महारास्त्राला माहीत व्हावा म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार. घुसमट मधील कविता अस्वस्थ करून गेली.
Chandana Patil - Shirdi
27 May 2014 10 10 PM
घुसमट हा संग्रह सर्वोत्तम असून यातील प्रत्येक कविता लाजवाब आहे.
रुपाली कदम - पंढरपूर
27 May 2014 10 08 PM
गुस्मात्चे मुख्पृस्त खरोखरच खप बोलके आहे,,, त्यावरूनच कवितांच्या विषयांचा अंदाज येतो. क्वतीता आवडल्या.
Dr. Pramod Kale - Akola
27 May 2014 10 06 PM
कवीने आपल्या जीवनातील घुसमट बाहेर काढली असे वाटले पण मी तर म्हणेन की ही घुसमट ही फाकेत कवी चीपार्गे यांची घुसमट नसून संपूर्ण समाजाची व प्रत्येक वाचकांची गुस्मात आहे असे मला वाटते. कवी डी बी यांना शुभेच्छा ..
डॉ उदय पाटील - सांगली
27 May 2014 10 03 PM
कविता खूपच आवडल्या, सर्वच कविता वास्तववादी आहेत.
यशवंत पाटणे - सातारा
27 May 2014 10 01 PM
सर्वच कविता एकाच साच्यातील असल्यामुळे थोडया कंटाळवाण्या वाटतात. पण काही कविता खूपच प्रबोधनपर आहेत.
Pravin Pandu Patil - Sulapur
27 May 2014 09 59 PM
Very good book... best poems ever I have read in my life... all poems have meening and a messge to the community.
Library
07 Jun 2013 09 04 AM
कविता आवडली, शब्दांची रचना बंधनात असली तरी ती तशी वाटत नाही अर्थात तेच तर कवीचे मोठे वैशीष्टे असते.
Jaysingpur Press Society
07 Jun 2013 09 01 AM
... काही पुस्तकं कायम आवडत राहतात, कधीकधी अख्खा संग्रह नाही, पण त्यातील काही कविता विषेतत्वाने आवडून जातात. कविता मरगळलेल्या शेतकऱ्याला स्फ़ूर्ती देणाऱ्या आहेत. कविता संग्रह वाचताना खूप मजा आली.
Jain Philately
07 Jun 2013 08 55 AM
कविता संग्रह वाचला खूप आवडला, धन्यवाद. वाचताना माझाच अनुभव कवी सांगत आहे असे वाटले. म्हणून कविता माझीच झाली....
Hobby Academy
07 Jun 2013 08 47 AM
अश्रू न येत नयनी अन् हुंदका फुटेना
धुमसून जाळणारा हा दाह साहवेना
अव्यक्त राहण्याची जी घेतली प्रतिज्ञा
कृत निश्चयामुळे त्या आक्रंदणे रुचेना
जरि गीत गातसे मी लय-तालही जुळेना
सम साधणे जमेना की षड्ज सापडेना
सोशीत येथ आलो कसल्या विचित्र वेणा
ही जखमही भरेना अन् रुधिरही स्त्रवेना
गेली कितीक वळणे मुक्काम आकळेना
क्रमतो अशी निरंतर ही वाट का सरेना
Creative English Academy
07 Jun 2013 08 44 AM
घराघरातून जाते हद्दपार झाले आणि जात्यावरच्या ओव्या हरवल्या. दळणकांडण संपले आणि त्याअनुषंगाने येणारी गाणीही कालौघात मागे पडली. परिणामी श्रम नावाची संकल्पानाच घरातून दूर जात आहे. त्यासाठी चालू काळात प्रत्येक माणसाने साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे. आपल्या देशाचा इतिहास हा साहित्यिकांमुळेच जिवंत आहे.
Alisha Advertising
07 Jun 2013 08 42 AM
अमावस्येच्या अंधाऱ्या रातीची घुसमट..
अमावस्येच्या अंधाऱ्या रातीची घुसमट..
काल ऐकली मी...
काय नव्हते त्यात...
सळसळ..थरथर..घालमेल..
तडफडीला,फडफडीला आवाज नव्हता त्या...
फक्त होती गहिरी खोली..... गुदमरून अंधारलेली...
मला माहित होतं....असंच असतं...
अशा रातीशी जास्त बोलणं रास्त नसतं...
पण तिलाही वाटत असेल ल्यावंसं..... चांदणं...
दुखत असेल असं..दर पंधरवड्याला...वांझोटं येणं....!!
उगाच फिरत बसते...मग ती अत्रुप्त आत्म्यांबरोबर...
स्मशानात बसून गप्पा मारते.... थडग्यांशी..
वेळ सरत नाही म्हणून...
खापरं गोळा करते फुटक्या मडक्यांची...
रस्ते सुद्धा साथ देत नाहीत तीला...
पडून असतात निपचित...तिमिरांध...!!
धावत सुटते मग ती अथपासून..इतिपर्यंत...
दिसतात मला तिचे अश्रू.... कट्टरकाळे अंधारथेंब...
बरं होईल..सापडली तीला जर एखादी...चंद्रशलाका..
साथीला राहील मग प्रकाश...चिरका...
बधिरलेला का होईना...!!!
डॉ. संजीवनी तडेगावकर, जालना
06 Jun 2013 11 56 PM
निवा-यासाठी थांबावं त्या झाडाच्या
सावल्याही लांबतच जातात
अशा वेळी घशात दाटणारे कढ
तुम्ही आतल्या आत गिरवायला शिका...
‘कवितेशिवाय जवळ काहीच नाही
कवितेतलं जगणंच तेवढं खरं उरलं.’
Universal Free School
06 Jun 2013 09 54 PM
खासगी शिक्षणसंस्थांतील महाग होत जाणारे शिक्षण, हे आजचे खरे आव्हान आहे. सधन वर्ग वगळता कुणालाही उच्च शिक्षण घेता येऊ नये, अशी स्थिती बाजारीकरणामुळे येते आहे.. अशा वेळी शिक्षणाऐवजी अस्मितांचे राजकारण केले जाते, तेव्हा पहिला बळी शिक्षणच ठरते!
'विद्येविना मती गेली,
मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले,
सारे अनर्थ एका अविद्येने केले'
Panchgani University
06 Jun 2013 09 50 PM
घरातलं घरपण जाणवत नाही हल्ली
नात्यातलं नातं तरी कुठं जाणवतय?
पण चुकतय कोण ? मीच !
नेहमी माझंच, हो माझंच तर चुकतयं.
नाही ! नाही जाणवत घर त्या चार भिंतीत
आणि नाही रमत मन चारच माणसात स्वार्थीपणे,
पण नाही देता येत स्पष्टीकरण या सगळ्याचं मला
मग कबूल करतो मी, माझंच तर चुकतयं.
मी लहान होत असताना चार भिंतीं खूप ...
Sabda in India
06 Jun 2013 09 48 PM
खूप काही बोलायचे होते
ते मनातच राहून गेले,
शांत घटीकेची वाट बघत
ओठच नि:शब्द होऊन गेले.
तू भेटल्यानंतरचे स्वप्न
बघण्यापुर्वीच अंधुक झाले,
मधेच वावटळ आली नि
शरीरच गारठून गेले.
दुखापातीनंतरच्या वेदना
तुला सांगायचे विसरून गेले,
तुझ्या कुशीत विसावण्याचे
ठरवलेलेही विसरून गेले.
कधी कधी जाणीव होते
तुझ्यावर मी अवलंबून राहिले,
मागे वळून पहिले तर
माझे विश्वच नष्ट झाले.
दोष कोणाचाही नसताना,
वाईट क्षण येऊन गेले,
स्थिर असणाऱ्या घडीला
पुन्हा विस्कटून गेले.