Hard Copy Price:
R 0 (Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
eBook Price:
R
50
/
$
1.00
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Summary of the Book
सौ. अनुराधा सचिन म्हापणकर, ह्या आपल्या शिल्पकार पतीच्या कला-व्यवसायात व्यावहारिक बाजूचे समर्थ व्यवस्थापन करतात. व्यवसायातल्या आकड्यांची दुनिया काहीशी निरस वाटली तरीही, व्यवसाय आणि शिल्पकार पतीच्या कल्पनाविष्काराच्या सान्निध्यात, सौ. अनुराधाच्या कला-साहित्य विश्वाची आवडही जोपासली जात होतीच. परंतु, कामाच्या वाढत्या व्यापात, शालेय जीवनापासूनची " कवितेची वही " मात्र एव्हाना, माळ्यावर सुखे-समाधाने नांदू लागली होती. तरीही, मनाच्या कोप-यात रुजलेली एक हळवी कविता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच अस्वस्थतेतून एक दिवस एक कविता, इंटरनेटच्या माध्यमातून ऒरकुटच्या पानावर पोस्ट झाली.. आणि मग त्यांना तो छंदच जडला. यथावकाश, लोकसत्ता, प्रहार सारख्या दैनिकांतून अनुराधा म्हापणकर, कधी काव्यरुपांत, तर कधी आपल्या लेखांतून वाचकांच्या भेटीस येत राहिल्या. " आयुष्याच्या मध्यभागी…. " ह्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्या पुस्तकरुपाने प्रथमच वाचकांच्या भेटीस येत आहेत !
अनुराधाजी आपला " आयुष्याच्या मध्यभागी " कवितासंग्रह खूपच सुंदर असून त्यातील कविता माणसाच्या जीवनातील प्रत्येक वाटेवरचे येणारे अनुभव सांगत आहे...खूप सुंदर.
प्राजक्ता पटवर्धन
22 Feb 2011 10 24 PM
सुरेख! मला पुस्तक घ्यायला आवडेल. भारतातून कोणी येणार असतील तर मी आणायला सांगेन.