महत्वपूर्ण पर्यावरणीय प्रश्नांचा उहापोह करणारा पुस्तक आहे.
Mandar Phanse
02 Jun 2024 05 30 AM
बसवंत विठाबाई बाबाराव या आमच्या मित्राचं पुस्तक जरा उशिरानेच वाचायला घेतलं, आणि पुन्हा एकदा विचारांचं काहूर माजलं.
नांदेड देगलूर च्या येरगी चा हा बहुभाषी तरुण, निसर्ग अभ्यासाने झपाटलेला आहे,घनदाट जंगलात,ओसाड माळावर, किंवा काटेरी झुडुपी सड्यावर भटकंती करतांना हा कुठेही सापडू शकतो.
झाडांची ,वनस्पती आणि पर्यावरणाची सतत काळजी करणारा ,तरुण हसतमुख लेखक.
लहान मुलांना निसर्ग ओळख करून देण्याची त्याची शैक्षणिक हातोटी विलक्षण आहे. त्याच्या या पुस्तकात जैवविविधता ,शाश्वत विकास दृष्टी आणि त्या अनुषंगाने आलेले सर्व प्रश्न यांचा उत्तम उहापोह केला आहे.
आपल्या देशात गरज असतांना नागरिक शास्त्र हा विषय अभ्यासक्रमात आला पण प्राधान्यक्रमात कधी आलाच नाही.
नागरिक आणि त्यांचे हक्क हे लोकशाहीत पक्ष, रंग, विचारधारा आणि भावानिकतेच्या वरचे आहेत हे अजूनही कुणाला पटत नाही.
आता पर्यावरण शास्त्र हा विषयही अभ्यासक्रमात आहे पण त्याची प्राथमिकता अजूनही कुणाला पटत नाही आणि पटली तर प्रत्यक्षात अमलात येताना दिसत नाहीये.
बसवंत सारखी झपाटलेली ,ध्येयवेडी माणसं भेटली ,वाचली की मनाची ताकद सुदृढ होत जाते. बसवंत खूप शुभेच्छा 💐
उषा केळबाईकर, खोपोली
12 Feb 2023 05 30 AM
सर्व पर्यावरण स्नेही शिक्षकांना माझा नमस्कार 🙏.
आपल्या सर्वांचे गुरु व आपल्या आदर्श व्यक्तिमत्वनापैकी एक श्री बसवंत विठाबाई बाबाराव.
सरांचे " हरितदृष्टी " हे पुस्तक मिळावायला मला थोडा वेळ लागला. दोनदा ते पुस्तक out of stock होते. नंतर " बुकगंगा टीम www.bookganga. com " च्या माध्यमातून मला हे पुस्तक मिळाले.
हरितदृष्टी
जैवविविधता आणि
शाश्वत विकासाचे शिक्षण.
हे पुस्तक आपल्या सर्वांच्या संग्रही जरूर असावे. फार छान पुस्तक आहे. हया पुस्तकात
शाश्वत शिक्षण आणि शाश्वत जीवनशैली
शेती आणि जैवविविधता
पाणी आणि जैवाविविधता
पर्यावरण आणि राजकारण हे चार मुख्य विभाग समावलेले आहेत.
हे पुस्तक आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. आपल पर्यावरण संवर्धनाचे काम अधिक योग्य रीतीने करण्यास हया पुस्तकाची नक्कीच मदत होईल.
बसवंत सरांनी हे पुस्तक लिहिल्याबद्द त्यांचे खूप खूप आभार. 🙏. त्यांच्या हातून पर्यावरण संवर्धनाचे असेच चांगले काम घडत रहो व अधिकाधिक लोकांना हरितदृष्टी लाभो, वसुंधरेचे रक्षण होवो हि ईश्वरचरणी प्रार्थना.
पर्यावरणीय प्रश्नांवर महत्वपूर्ण पुस्तक. प्रत्यक्ष या क्षेत्रात काम करणारे बसवंत सारखे तरुण, पुढच्या पिढ्यांसाठी पथदर्शी काम करत आहेत. हे खूप आश्वासक आहे. त्यांचे दैनंदिन जीवनतील अनुभव इतरांना पर्यावरणाच्या प्रश्नाकडे डोळसपणे पाहण्यासाठी उपयुक्त ठरतील.
It IS VERY ESSENTIAL BOOK IN Environmental issues. I got chance to read few articles from book. Please make it available. Thanks Baswant Vithabai Babarao for writing such book.
All the best.
Gajanan kale
04 Apr 2023 05 30 AM
शिवारातील जीव विविधता, अन्न साखळी टिकून राहिली तरच गावचा विकास करता येईल. रस्ते, मोठे इमारती यातून एक वेळ विकास झाल्यासारखे दिसेल मात्र लोकं समाधानी होणार नाहीत.हा महत्वाचा विचार सोप्या भाषेत, कथेच्या सारखे, लिहिले आहेत. हरित जाहीरनामा हा महत्वाचा लेख आहे. लोकांनी मतदान करताना या लेखातील गोष्टी विचारात घेऊन मतदान करणे आवश्यक आहे. हरितदृष्टी पुस्तक म्हणजे पर्यावरण विषयातील सोपी आचार संहिताच आहे. बसवंत विठाबाई बाबाराव या मित्राचे खूप खूप अभिनंदन.
विकास कशास म्हणावे, काय मिळवलं म्हणजे विकास झालं किंवा विकास केलं? एका बाजूला वैभव संपन्न जैवविवधता, रानमेवा, रानभाज्या आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक औषध गोळ्या. निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्ही निवडाल? मग धोरणात्मक प्राथमिकतेचा मुद्दा येतो तेव्हा हे निवड कठीण का होते? याबद्दलची सोप्या शब्दात मांडणी पुस्तकात केलेली आहे.
- शिवराज ढुमणे
Haritdrushti is a Good book, you can not keep it down for sure. I finished it in two days. Really interesting story about Environment and Biodiversity around us.
Lata Pratibha Madhukar
27/03/2023
'हरितदृष्टी' पुस्तकाचे लेखक बसवंत विठाबाई बाबाराव हा व्यासंगी असून विद्याक्षेत्रात जम बसवायचा असेल तर त्या अभ्यास, संशोधनाला पुस्तक रुपात आणण्याचे उपजत शहाणपण लेखकात आहे. पर्यावरण, प्राकृतिक संसाधन संरक्षण याबाबत जेवढा अभ्यास तेवढेच धोरणात्मक आणि आकलन आहे आणि जमिनीशी असलेले घट्ट नाते. आपल्या क्षेत्रातील जैविक नाळेमुळे ते खरे खुरे लिहू शकतात, गुणी माणसं संग्रहित करू शकतात आणि त्यांना लिहिते करू शकतात. तसेच स्वतः लिहिते राहतात. पुस्तक प्रकाशनासाठी मनापासून सदिच्छा व अभिनंदन!
- डॉ. लता प्रतिभा मधुकर, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, प्राध्यापिका
PRAVIN BHAUSAHEB THETE
24/03/2023
Haritdrushti is Well articulated book. It covered many important issues in environment education.
Bhaiya Deshmukh
14/03/2023
पुस्तकात छान माहिती दिले आहे. छान मार्गदर्शन केले आहे. पर्यावरण माहिती व् मर्ग्दरह् मिळते. नदी आपणाला पाणी देते, पीक वधव्ते तरी काही कंपनीचे लोक मात्र त्यात घाण सोडतात, सिटी मधील लोक कचरा टाकतात. नदी पोहायला येण्यासारखा असावी.
Prabhakar Thigale
14/03/2023
पुस्तक शेती प्रश्न किती महत्वपुर्ण आहे हे सांगणारे आहे. शेतकऱ्यांनी आपले बी बियाणे टिकवून धरुन् शेती चांगले करू शकतो. नाही तर कंपनी वाले, दुकान वाले खूप नफा घेतील, आपली शेती आणि मालक ते होतील. हे खरी गोष्ट सांगितली आहे.
Suparn Jagtap
03 Oct 2023 05 30 AM
हरितदृष्टी हे बसवंत विठाबाई बाबाराव या मित्राने लिहिलेलं पुस्तक. शिवारातील जैव विवधतेचा आढावा घेणारा सुंदर पुस्तक आहे. गाव शिवारातील टेभरं , अळीव, चारोळी, कारं, बोरं आणि कैक रानमेवा संपवायचा आणि त्यानंतर शासकीय योजनेतून लोह, फाॅलीक अॅसिडच्या गोळ्या , कॅल्शीयम पावडर गावागावात पोहचवायचेहे आजचं सार्वत्रिक चित्र.
वयात येणाऱ्या मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण खमी करण्यासाठी म्हणून सर्व राज्यातील शाळांमध्ये आयर्न फाॅलीक अॅसिडच्या गोळ्या दिल्या जातात. काही राज्यांत कॅल्शीयमची पावडर ही दिली जाते. या गोळ्या आणि पावडर मोफत दिली जाते. वरकरणी या मोफत कार्यक्रमातील उलाढाल ही कोट्यावधी रुपयांची असते. या तात्कालिक व तात्पुरत्या उपाययोजना म्हणून ठिक आहे. मात्र कुपोषण संपवून आपल्या समाजाचं आरोग्य सुदृढ बनवायचं असेल , तर शेती आणि शेती, गाव शिवारातील जैवविविधता समृद्ध करण्याच्या दिशेने पायाभूत कार्यक्रम आखणं गरजेचं आहे. अशीच भूमिका मांणाऱ्या चाळीस लेख या पुस्तकात आहेत. संग्रही ठेवावा असे हे पुस्तक माहितीपूर्ण व वाचनीय आहे.
- सुपर्ण जगताप
Sampat Dhavale
03 Oct 2023 05 30 AM
शेती मधील पेरणी पद्धती, मिश्र पाटा पद्धती, शेतकरी स्वालंबी होण्यासाठी बियाणे जपून ठेवण्याची गरज ही आजच्या काळाची गरज आहे, हे या पुस्तकात मुद्देसूत लिहिले आहे.
शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाऊस पाणी सोबतच धोरण बदलणे किती महत्वाचे आहे, हे या पुस्तकात मांडले आहे.
शेती सोबतच पर्यावरणाचे प्रश्नाचे सर्व बाजूल लक्ष्यात घेऊन विश्लेषण केले आहे.
Dilip Paatil
03 Jul 2023 05 30 AM
हारीतदृष्टी हे पुस्तक विस्तृत, मुद्देसुद, चिकीत्सक आणि वैज्ञानिक गोष्टी मांडलेले पुस्तक आहे! पुस्तक वाचल्यावर हरितदृष्टीच येईल समोरच्या व्यक्तीला. एका वाक्यात— आपल्या सभोवतीच्या सजिव—निर्जिव घटकांबद्दल नवदृष्टी देणारे —हरितदृष्टी!!
दिलीप पाटील
Vijaya Padekar
03 Jun 2023 05 30 AM
*समाजाच्या शाश्वत विकासाची दृष्टी देणारी हरितदृष्टी!*
सर्वप्रथम लेखकाचे खूप खूप अभिनंदन आणि आभार!🌱 की पर्यावरणाचे इतके व्यापक ज्ञान वाढविण्यासाठी अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी इतका मोठा सर्वांना रुचेल पचेल असा ओघवत्या शैलीतला साध्या सरळ भाषेतला अनमोल खजिना उपलब्ध करून दिला.'हरितदृष्टी' खरंच अफलातून नाव आहे.नावातच खूप काही दडलेलं आहे. “हरितदृष्टी: जैव विविधता आणि शाश्वत विकासाचे शिक्षण हे इथून पुढच्या पिढीसाठी चांगले आयुष्य घडविण्यासाठीची सर्वात महत्वाची शिदोरी आहे.
लेखकाची जडणघडण त्यांच्या माई ,अप्पा यांच्या सहवासात झाली ते अनुभव, शाश्वत शिक्षण आणि शाश्वत जीवनशैली, शेती आणि जैवविविधता, पाणी जैवविविधता, पर्यावरण आणि राजकारण अशा चार महत्वाच्या विभागात विविध लेख एकत्रित करून लेखकाने यात स्वतःच्या अनुभवातून, लोकशिक्षणातून, कृतीतून स्वतःचा वेळ खर्च करून पुस्तक लिहिले आहे.
- विजया पडेकर, आपलं शिवार, आकोले, अहमदनगर
Vikas Kapole
03 Jun 2023 05 30 AM
मराठी भाषेतील एक सुंदर पुस्तक. पर्यावरण संकल्पना, प्रक्रिया, सिद्धांत यांची सरळ व सोप्या भाषेत लेखन केले आहे. ई आय ए बद्दल लिहिलेला लेख राजकीय लोकं आपल्या पर्यावरणाचे सर्वात मोठे नुकसान कसे करतात याबद्दल महत्वपूर्ण मुद्दे लिहिले आहेत.
हरित जाहीरनामा हा लेख देखील महत्वपूर्ण आहे. आता नवीन राजकीय दृष्टी असणारे लोकं सत्तेत येणे गरजेचे आहे. पर्यावरण हा सर्व विषयाच्या केंद्र बिंदु बनल्याशिवाय परिस्थिति सुधारणा होणे अवघड दिसते. पुस्तक प्रत्याकांनी वाचून सजग व्हावे असे आहे.
Suwarna Kharade
03 Jun 2023 05 30 AM
पर्यावरण, शेती, शिक्षण, राजकारण याविषयी अभ्यासपूर्ण मांडणी पुस्तकात केली आहे. पर्यावरण विषयी भावनिक भूमिका पेक्षा वस्तुनिष्ट भूमिका घेणे किती महत्वाचे आहे हे या पुस्तकात उत्तम पद्धतीने मांडणी केली आहे. पुस्तकातील प्रतेक लेख अभ्यासपूर्ण आहेत. शहरी पर्यावरणाचे प्रश्न देखील लेखकांनी अभ्यासपूर्ण मांडले आहेत. वाहतुकीचा प्रश्न, शहरातील हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न, गच्चीवरील बाग हे त्यातील महत्वाचे लेख आहेत. पर्यावरण विषयी जाणीव असणाऱ्या प्रत्यक भारतीय नागरिकांनी वाचायला हवे असे हे पुस्तक आहे.
नागनाथ गंटावार
03 Jun 2023 05 30 AM
पुस्तका बद्दल मनपूर्वक अभिनंदन!!
गाव शिवरतील गोष्टी, आब्याची गोष्ट, आंब्याचे महाराष्ट्रातील प्रकार, यळवस सारखा महत्वपूर्ण सन याबद्दल खूप छान माहिती पुस्तकात दिली आहे. शेतीच्या प्रश्नांविषयी चांगली मांडणी केली आहे.
Komal Patil
03 May 2023 05 30 AM
बसवंत विठाबाई बाबाराव यांची 'हरितदृष्टी' हे पुस्तक फारच उत्सतम आहे. अनेक विषय हाताळले आहेत. गार्डनिंगपासून ते शाश्वत जीवनशैलीपर्यंतच्या अनेक विषयांना हे पुस्तक स्पर्श करते. आपण जरी शहरात राहत असू, तरी आपल्या बहुतेकांची नाळ ही ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. बालपणीच्या माझ्या आठवणींमधील अनेक गोष्टींचा पुनर्प्रवास या पुस्तकातून मला करता आला. शेताबद्दल माहिती असली तरी जंगले, तेथील जैवविविधता, रानभाज्या, त्याला जोडून येणार्या सणांबद्दल नवीन माहिती मिळाली.
- कोमल पाटील
Shailaja Deshpande
03 May 2023 05 30 AM
पर्यावरण विषयावरील एका वेगळ्या धाटणीचे हे पुस्तक आहे. अगदी झाडं लावण्यासारखी छोटी कृती देखील किती विचारपूर्वक करायला हवा. लोकांचा सहभागाने रोपणाची निवड, जागेची निवड, स्थानिक जैवविविधता किती तरी गोष्टी विचार करणे गरजेची असतात. एकूणच आपण पर्यावरण जतन करीत असतांना करीत असलेल्या कृतीकडे चिकित्सक बघायला लावणारे हे पुस्तक आहे. विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, कर्मचारी, धोरणकरते सर्वाना मार्गदर्शक ठरेल असे पुस्तक आहे. या पुस्तकाचे एक वेगळे व खास वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये अनेक रुचकर खाद्य पदार्थांची रेसिपी दिलेले आहेत. पौष्टिक आंबील, भजीची भाजी, मेथोनी, ज्वारीचा भात.. पुस्तक वाचता वाचता ह्या रेसिपी करून खायला देखील मज्जा येते.
संग्रही ठेवावा, लहान मुलांना वाचून दाखवावा असा पुस्तक आहे.
शैलजा देशपांडे
Appa Deshmukh
03 May 2023 05 30 AM
हरितदृष्टी हे अभ्यासपूर्ण लिहिलेल्या लेखांचे संग्रह आहे. एका राज्यशास्त्राचा विद्यार्थी सामाजिक शास्त्रांच्या परिभाषेत पर्यावरणीय प्रश्नाची सोडवणूक कशी करता येईल याबद्दल लिहिलेलं हे उत्तम पुस्तक आहे.
निव्वळ पर्यावरणीय प्रश्न नव्हे तर एकूण समाजाच्या शाश्वत विकासासठी दृष्टी देणारी ही हरितदृष्टी अनेकअर्थाने महत्वपूर्ण आहे.
प्रा. आप्पा देशमुख
Sanay Parab
03 Apr 2023 05 30 AM
हरितदृष्पुटी हे पुस्तक मिळाले आणि वाचून सुद्धा झाले. आपलं महानगरमध्ये काटछाट झालेले लेख नव्याने आणि पूर्णपणे वाचताना मनापासून आनंद झाला... हे संग्अरही ठेवता येईल असे दस्सातऐवज झाले आहे. आपले महानगर मध्चयेजेव्हा लेख येत होते तेव्हा देखील अनेकांनी लेखाबद्ल चांगला प्रतिसाद दिला होता. असाच लिहिता राहा.🤝 खूप सदिच्छा..!!
प्रकाश परब
Gajanan Birajdar
03 Apr 2023 05 30 AM
हरितदृष्पुटी हे पुस्तक खरच खुप छान लिहलय...पर्यावरण एवढी वैविधता आहे हे माणूस विसरूनच गेला आहे, त्यातील आनंद घेणे ही लांबची गोष्ट
फक्त पैशात आडकलाय.... त्यामुळे पर्यावरणाची एवढी हानी होतीये
खुप नवीन माहिती भेटली. सर्वांनी वाचावी असी पुस्तक आहे.
Mahadevi
03 Apr 2023 05 30 AM
पुस्तक आपल्या जीवनातील प्रश्नांची माहिती देते. समजायला सोपी आहे. पर्यावरण विषय समजून घेण्यासाठी पुस्तक उपयोगी आहे. पर्यावरण शास्त्र हा विषय कम्पलसरी केला आहे, मात्र कॉलेज मध्ये पुस्तकं मिळत नाहीत. हे पुस्तक सर्व कॉलेज मध्ये ठेवायला पाहिजे असे पुस्तक आहे.
Ganesh Chappalwar
03 Apr 2023 05 30 AM
हरितदृष्टी हे बसवंत विठाबाई बाबाराव यांचे पुस्तक म्हणजे पर्यावरण क्षेत्राबद्दल आकलन वाढविण्यासाठीचे सर्वात योग्य माध्यम आहे. लोक शिक्षक म्हणतात येईल अशी साधी, सरळ, सोपी पण स्पष्ट विचार मांडणारी भाषा आहे. अतिशय अवघड संकल्पना देखील सोप्या करून मांडल्या आहेत. शेती, पर्यावरण, शिक्षण या विषयी एकूण चाळीस लेख पुस्तकात आहेत. प्रत्येक शिक्षकांनी संग्रही ठेवावा असा ग्रथ म्हणता येईल असे पुस्तक आहे.
Ganpat Dhumale
03 Feb 2023 05 30 AM
विकासाच्या चुकीच्या कल्पना व शाश्वत विकास या विषयी पुस्तकात बरेच लेख आहेत. शिक्षकांना उपयोगी ठरतील अशा ज्ञानरचनावादी पद्धतीने शिकण्या-शिकविण्याच्या गोष्टी, उपक्रम यांचा यात समावेश आहे. आपली वनसंपत्ती, वनवैभव मांडत असतानाच रोजच्या जगण्यातून पर्यावरण रक्षण कसे करता येईल याची दृष्टी हे पुस्तक आपल्याला नक्की देईल असा विश्वास वाटतो. आपण सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचावे व संग्रही ठेवावे असेच आहे.
प्रा. गणपत धुमाळे
"Haritdrushti" is a book written by the environmentalist, activist, and writer Baswant Vithabai Babarao. The book was published in 2022 and is an insightful analysis of the traditional Indian wisdom and practices related to ecology and environment.
The book, which is written in the Marathi language, explores various topics such as Biodiversity education, water management, sustainable agriculture, forestry, and natural resource management. Mishra draws on his extensive research and fieldwork in different parts of India to provide a comprehensive and nuanced understanding of the relationship between nature and society.
One of the central themes of the book is the idea that nature is not merely a resource to be exploited but a living entity with its own rights and dignity. Baswant argues that traditional Indian wisdom recognizes this fact and that we need to rediscover and reapply these principles in our contemporary context to achieve sustainability.
श्री. कौस्तुभ दिवेगावकर (भा.प्र.से.)
27/02/2023
आज आपण पर्यावरणाच्या व्यवस्थात्मक विनाशाकडे जात आहोत. ही बाब पुस्तकाच्या पातळीवर मांडणं खूप अवघड असते. सोप्या भाषेत लिहिण खूप अवघड आहे आणि हे अवघड काम या पुस्तकानं अगदी लिलया पद्धतीनं केलं आहे.पुस्तकाच्या माध्यमातून केलेला हा हस्तक्षेप हा संविधानिक चौकटीतला आहे पण त्याच्यातली दृष्टी ही ‘लैंगिक समभाव’ मांडणारी आहे. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या पुस्तकाचं आहे, असं मला वाटतं.
या पुस्तकातील लेख हे सद्यःस्थितीच्या वास्तवाची जाणीव करून देतात. आपल्या आजूबाजूला काय जळतंय, आणि ते कसं पाहायला पाहिजे, याबाबतची एक दृष्टी मिळते. याचेच प्रत्यंतर विकसित आणि अविकसित भागामध्ये मिळणारे पेयजलाचे उदाहरण असलेला लेख. या लेखात लेखक लिहितात ते आणि त्यांचे शहरातील मित्र त्यांचं गाव असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचतात, तेव्हा तिथल्या टोलेजंग इमारती, चकाचक रस्ते पाहून आता आपले गाव बदलल्याची, गावाचा विकास झाल्याची चर्चा होत असते. पूर्वी येथे प्यायला पाणी पाणपोई वा हापशाचे (कूपनलिका) पाणी हापसून मिळवावे लागत होते, आता बाटलीबंद शुद्ध पाणी मिळते. मात्र लेखक या विकास मॉडेलमध्ये खिशात २० रुपये असणारच पाणी पिऊ शकतो, याकडे लक्ष वेधतात.
पुस्तकात मांडलेले विविध लेख वाचताना मी ते स्वतः जगत होतो. मला फिल्डवरती काम करताना आलेले अनुभव व किस्से झरझर डोळ्यासमोरून जात होते. आंब्याचा लिहिलेला लेख तर मी प्रत्यक्ष जगला आहे, यातील प्रत्येक परिस्थिती हि डोळ्यासमोर दिसत होती. खुजे पण फांद्याचा विस्तीर्ण विस्तार असलेले झाड, आंबे काढण्याची पद्धत, वाटणी व लहानपणी झाडाच्या सोबतचे लेखकांनी अनुभवलेले प्रसंग, प्रत्यक्षात दिसत होते. आंब्याचे झाड तोडल्यावर लेखकाला जेवढे दुःख झाले असेल तेवढेच ते वाचताना मला हि झाले. असेच एक ना अनेक प्रसंग मी पुस्तक वाचताना जगलो आहे आणि मला वाटत हे खर लेखकांच्या लिखाणाचे सामर्थ्य आहे. आजकाल आपण पुस्तकातून शिकलेल्या किंवा स्मरणात ठेवलेल्या बाबींना ज्ञान म्हणत आहोत पण आपल्या आसपास जी काही वृद्ध व्यक्ती आहेत त्या ज्ञानाने भरलेली तिजोरी आहेत, त्यांच्याकडील ज्ञान समजून घेणे खूप आवश्यक आहे. याच ज्ञानातून जगण्याचे व पर्यावरणाचे शिक्षण आपण घेवू शकतो हे कदचीत आपण विसरलो आहोत. आपला स्क्रीन टाईम वाढत आहे व याचवेळेस संवाद हरपत आहे. हा सुसंवाद का गरजेचा आहे हे बसवंत विठाबाई बाबाराव यांनी प्रत्येक वेळेस विविध उदाहरणातून सांगितलेला आहे.
गणेश सातव
आदरणीय, श्री. बसवंत सर मनःपूर्वक अभिनंदन..... उकृष्ट , अप्रतिम लिखाण.... ओघावती भाषाशैली, सर्व वयोगटाला पचेल रुचेल अश्या आश्ययाची मांडणी, माणसाचा पर्यावरणाकडे बघण्याचा हरीतदृष्टिकोन आपण हरीतदृष्टि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून दृष्ठीक्षेपात आणून दिला त्या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! आपण या पुस्तकाच्या माध्यमातून समाजातील शैक्षणिक, सामाजिक , राजकीय अश्या सर्वच स्तरातील लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे...खूप खूप धन्यवाद ! भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा ! ...आपला शुभेच्छुक .... प्रा. जीवन वाघ (नाशिक)
हरितदृष्टी हे बसवंत विठाबाई बाबाराव यांचं पुस्तक म्हणजे पर्यावरण या विषयावरचं नितांत सुंदर अभ्यासपूर्ण पुस्तक होय.
काय आहे यात? पर्यावरणा संबंधित प्रश्न आहेत, उत्तरं आहेत पर्यावरण रक्षणासाठी अनेकांनी केलेले प्रयत्न, त्यांना प्रयत्नांना आलेले यश सगळं काही आहे यात. प्रत्येक घटकाचा सखोल अभ्यास आहे त्यावर उपाय आहेत.
नंदा पाटील, जळगाव, ग्रामीण शेती व जैवविविधता अभ्यासक.
Vijaya Kulkarni
21/02/2023
'हरितदृष्टी: जैवविविधता आणि शाश्वत विकासाचे शिक्षण' हे बसवत विठाबाई बाबाराव यांनी त्यांच्या अभ्यास संशोधन आणि वैयक्तीक अनुभवातून लिहलेले पुस्तक आहे. मनोगत वाचत असतानाच माझी उत्सुकता वाढली होती. एखादा लेख वाचायला घेतला की एखाद्या कथेबाबत होते तसे, त्यापुढच्या लेखामधे काय लिहिलेले असेल, इतकी ती उत्सुकता ताणली जायची.
पुस्तक वाचून झाल्यावर, त्यातील काही लेख मी माझ्या आठ वर्षांच्या मुलीलाही वाचून दाखवला. तिलाही खूपच आवडले. अनेक नवीन प्रकारची माहिती तिला कळली. आपल्या आजूबाजूपेक्षा किती निर्सगात विविधता आहे, हे ही समजले.
पक्ष्यांची, भाज्यांची, झाडांची नुसती नावे ऐकूण ही ती अवाक झाली. ‘जंगलातील भटकंती’ हा लेख वाचताना तिलाही वाटले की आपण खूप काही मोठ्ठं, महत्त्वाचं असं 'मिस' करत आहोत. अजूनही त्याबद्दल प्रश्न विचारणे सुरूच आहे. तिच्या प्रतिक्रियांवरून वाटले, हे पुस्तक मुलांसाठी ही महत्वाचे आहे. लहानपनापासूनच संवेदना जागा झाल्या तर निर्सगाचे संर्वधन करण्यासाठी वेगळे काही करावे लागणार नाही. लहान मुलांना हे पुस्तक जरूर वाचून दाखवावे, वाचावयास द्यावे.
विजया कुलकर्णी,
मानोसोपचार तज्ज्ञ, पुणे
माणसाच्या जगण्यातील बेसिक गोष्टी वृक्षारोपणातील देशी विदेशी वाद, शाश्वत शिक्षणातील संकल्पना, रानभाज्या बद्दलचा, बाजारामुळे शेतीची झालेली दैना, पुर्वीच्या शेतीत जैवविविधतेच्या माध्यमातुन विकसित झालेले शाश्वत मॉडेल व आताची दैना, वीज वापर, गौतमबुद्धांचे उदाहरणावरुन वस्तुचं मोल, जलसंवर्धनाच्या रुढ कल्पना व त्यावरील अतिशय शास्त्रशुद्ध उपाययोजना, पुढची पिढी निसर्गाबद्दल, स्त्रोंताबंद्दल संवेदनशील असावी म्हणुन त्यांची शिवारासोबत नाळ कशी जुळली राहील याबाबतीतील मार्गदर्शन, नद्या, जलस्त्रोत, पाणथळी बद्दलची तळमळ कारण अब्जावधी जीव पाणथळ जमिनीच्या आधाराने सृष्टीचक्रात मोलाचं योगदान देत असतात. जैवविविधता टिकुन राहावी म्हणुन, स्थानिक व, बेसिक बियाणांची गरज, प्लास्टिक, जैविक कचरा या बाबतीतील स्वच्छतेच्या राजकारणी, समाजकारणी यांच्या कल्पना कारण कचरा जाळुन आपण दुप्पट प्रदुषण करतो याचं भान नसणं याचं खुप अभ्यास पुर्ण निष्कर्ष या पुस्तकाच्या माध्यमातुन मांडले आहेत पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणार्या संवेदनशील लोकांना या सगळ्या नक्की गोष्टीचा फायदा होईल.
- मीरा कोरपे, सामाजिक कार्यकर्त्या, अकोट, अकोला.
आजच्या या काळात भारतीय समाज आणि पर्यावरण यांच्या परस्परसंबंधांचे जात, वर्ग, लिंगभाव आधारित विश्लेषण करण्याची नितांत आवश्यकता वाटते. या अनुषंगाने सामाजिक शास्त्रांच्या दृष्टिकोनातून पर्यावरण संवर्धनाची मांडणी करणाऱ्या साहित्याची गरज खऱ्या अर्थाने अधोरेखित होते. मा. बसवंत विठाबाई बाबाराव लिखित 'हरितदृष्टी: जैवविविधता व शाश्वत विकासाचे शिक्षण' हे पुस्तक याच पठडीतले असल्याचे पानोपानी जाणवते. अशा प्रकारच्या साहित्यातूनच शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला हातभार लागण्यास मदत होणार आहे हे नक्की!
अमित वाडेकर, कार्यकारी संपादक, वनराई
बसवंत विठाबाई बाबाराव या मित्राच 'हरितदृष्टी' हे पुस्तक प्रकाशित होण ही खूप आनंद देणारी घटना आहे. मागील 20 वर्षांपासून बसवंत सोबतची मैत्री व संवाद आहे. त्याचा सुरु असलेला अभ्यासनीय प्रवास महत्वाचा आहे. एखाद्या विषयाला वाहून घेत त्यातील सर्व बाजू समजून घेत, विषयाच आकलन करत प्रत्यक्ष व्यवहारतील हस्तकक्षेपातुन तो सतत नव्याने शिकत असतो. त्याच्याशी जेव्हा जेव्हा संवाद साधतो, तेव्हा तेव्हा सहजतेने आपले अनुभव, त्या विषयाच्या विविध बाजू समोर आणतो. त्याच्या जगण्यातील इतकी सहजता आणि अभ्यास आपल्याला जमिनीवर आणतो. त्याच्या हातून अनेक प्रकारच लिखाण घडो ही सदिच्छा आणि पुस्तक प्रकाशित झाल त्याबद्दल खूप अभिनंदन.
अनिल जायभाये
Snehal Thakkar
13/02/2023
जगण्याच्या मुलभूत प्रेरणा आणि आज आपली चुकलेली दिशा याबद्दल लोकांचे आणि व्यव्यस्थेचे डोळे उघडवीणारे हे पुस्तक आहे. खर तर हे पुस्तक शालेय शिक्षणात अनिवार्य केले पाहिजे असे आहे, परंतु आपल्या कडील शिक्षण व्यवस्था इतकी उदासीन आहे आहे कि अनेक चांगली पुस्तके धूळखात पडलेली आहेत. जे पुस्तक आयुष्य घडवणे, जगण्याची शाश्वत कौशल्य देणे अशी पुस्तके लोकांपर्यंत पोहचतच नाही हि खरतरं वाईट गोष्ट आहे.
स्नेहल ठक्कर, लिंगभाव अभ्यासक, पुणे
Sanjeev Chandorkar
13/02/2023
बसवंत विठाबाई बाबाराव सारखे पर्यावरणीय प्रश्नांवर स्वशिक्षण, लोकशिक्षण, प्रयोग, संघर्ष अशा अनेक आघाडयांवर एकाचवेळी काम करणारे तरुण , पुढच्या पिढ्यांसाठी पथदर्शी काम करत आहेत. हे खूप आश्वासक आहे. मी वर व्यक्त केलेल्या अपेक्षांची परिपूर्ती बसवंत कडूनच होऊ शकते. बऱ्याचवेळा काम करतांना त्यांनी केलेले मनन, चिंतन, त्यांचे अनुभव, त्यांनी शेकडो मानवी तासांची गुंतवणूक करून मिळवलेली अंतर्दृष्टी यांचे दस्तावेजीकरण होत नाही. हरिती पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित करीत असलेले “हरितदृष्टी: जैव विविधता आणि शाश्वत विकासाचे शिक्षण” हे पुस्तक या अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी उपयोगी पडेल हे नक्की.
बसवंत विठाबाई बाबाराव , हरिती पब्लिकेशन्सची टीम या सर्वाना आणि येऊ घातलेल्या पुस्तकाला शुभेच्छा !
संजीव चांदोरकर
टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई
Neeta Khade
02 Dec 2023 05 30 AM
निसर्ग निसर्गातील बदल त्यांच्या निरीक्षणातून वैज्ञानिक ज्ञाननिर्मिती कशी होऊ शकते आणि हे सहभागी पद्धतीने आपल्याला कसे करता येऊ शकते याचे सुंदर विवेचन या पुस्तकात केलेले आहे. व्यक्तिगत सवयी आणि राहणीमान यामध्ये काही बदल करून आणि शासकीय धोरण या बाजूने करून सद्यस्थिती नक्कीच बदल घडू शकतो.लोक स्वत: जैवविविधता नोंदवह्या कशाप्रकारे अर्थपूर्ण करता येतील याबद्दल हे भाष्य केले आहे.याठिकाणी लेखकाने फक्त कोण्या एका व्यक्तीकडून पर्यावरण संवर्धनाची अपेक्षा व्यक्त केलेली नाही तर त्यात सगळ्या घटकांचा सहभाग अपेक्षित आहे.त्यामध्ये शाळा असतील,शिक्षक असतील विद्यार्थी आहे सर्वसामान्य नागरिक तर शासन आणि ही यामध्ये अधिक लक्ष घालून या सगळ्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे कशी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाचावे समजून घ्यावे असे हे पुस्तक आहे.जेणेकरून ही हरितदृष्टी प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होईल.या सृष्टीचा हा अनमोल ठेवा आपण पुढच्या पिढीपर्यंत असाच कायम ठेवू शकतो.नवागत पर्यावरणमित्रासाठी हे पुस्तक नक्कीचं मैलाचा दगड ठरणार यात शंकाचं नाही.
नीता तोडकर खाडे(शिक्षिका)
जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव.
Shruti Kulkarni
02 Oct 2023 05 30 AM
नजर आणि दृष्टी खरतर डोळ्यासंबंधी विशेषणे पण ह्या दोन्ही मधला फरक खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुस्तकाच्या नावातच पुस्तकाचे यथार्थ वर्णन समजून येते. कारण आपण आजूबाजूला खूप गोष्टी पाहतो पण ती समजण्याची किंवा उमजण्याची दृष्टी आपल्याकडे असेल असे नाही.
हे पुस्तक लिहताना बऱ्याच गोष्टीचा उहापोह केला गेला आहे. व्यवस्था आणि त्यासंबंधी उपस्थित केलेले प्रश्न बऱ्याच जणांना अंजन घालतील अशी आशा वाटते.
नुसते प्रश्न उपस्थित करून ते सोडून दिलेले नाहीत तर स्थानिक पातळीवर करू शकणाऱ्या उपायांची चर्चा देखील इथे केली गेली आहे.
काही केस स्टडी आणि उदाहरणे देऊन शाश्वत विकास कसा करावा हे स्पष्ट केले आहे जे प्रक्रियेमध्ये फार महत्त्वाचे आहे.
कारण कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत नुसते प्रश्न विचारून काम भागत नाही तर उपायांची चर्चा झाली तर बदलाची सुरवात म्हणता येते.
हे पुस्तक पर्यावरण चळवळ आणि सामान्य माणसं ह्यातली दुवा ठरेल अशी अपेक्षा करते.
डॉ.श्रुती कुलकर्णी
पर्यावरण सल्लागार , पीएमसी
नागालँड एज्युकेशन प्रोजेक्ट
कोहिमा, नागालँड.
Udhav Dhumale
02 Oct 2023 05 30 AM
*शाश्वत पर्यावरण रक्षणाची दृष्टी देणारे पुस्तक*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रत्येक गोष्ट-सिद्धांत-माहिती अनुभवाच्या कसोटीवर तपासून घेणारा, अत्यंत संयमी, तितकाच करारी, जिद्दी, कायक वे कैलास हा महात्मा बसवेश्वर यांचा विचार आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संत तुकोबांचा विचार जीवनात अंगिकारणारा बसवंत विठाबाई बाबाराव हा माझा मित्र. आमच्या मैत्रीला वीस वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचवेळी त्याच अनुभव सिध्द अस शास्वत विकास आणि पर्यावरण यावर प्रकाश टाकणारं पुस्तक प्रकाशित होत आहे. याचा मित्र म्हणून सार्थ अभिमान वाटतो.
सामान्य माणूस ज्यामुळे नकारात्मक होतो, त्या गोष्टी देखील सकारात्मकपणे घेता येऊ शकतात हे त्यांनी जीवनात दाखवून दिले. उदाहरणार्थ आम्ही बी. ए. ला असताना बसवंतला मराठीच्या प्राध्यापकाने वर्गातून बाहेर काढले होते. त्यानंतर तो वर्षभर वर्गात आला नाही पण तो वेळ त्याने ग्रंथालयात घालवला. याची दखल घेत त्याच प्राध्यापकांनी स्वतःच अवांतर वाचनाचा पुरस्कार सुरू केला आणि पहिला पुरस्कार बसवंतला दिला.
....
उद्धव धुमाळे, उपसंपादक, लोकमत, पुणे
Sominath Gholawe
02 Oct 2023 05 30 AM
हरितदृष्टी : जैवविविधता आणि शाश्वत विकासाचे शिक्षण – बसवंत विठाबाई बाबाराव, हरिती प्रकाशन, २०२२
गेल्या तीन दशकांच्या कालावधीत मानवी जीवनासह पर्यावरणीय जैवविविधता आणि शाश्वत विकास यासंदर्भातील अनेक प्रश्न हे गुंतागुंतीचे झालेले आहेत. याकडे जाणीवपूर्वक आणि सुप्तपणाने दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्याचे परिणाम मानवी जीवनावर व निसर्गावर हळूहळू दिसू लागले आहेत. पण या प्रश्नांच्या चक्रांमध्ये अडकून न बसता, महत्व आणि गांभीर्य ओळखून प्रश्नांची चिकित्सा तितक्याच चिकाटीने, संवेदनशीलतेने या पुस्तकाच्या माध्यमातून झालेली आहे. या पुस्तकातील सर्व लेख समाजाभिमुख भूमिकेतून पुढे आलेले आहेत. या लेखांच्या माध्यमातून “बसवंत विठाबाई बाबाराव” यांनी जैवविविधता आणि शाश्वत विकासाचे शिक्षण सांगताना, लोकसहभागावर आधारित विकेंद्रित स्वरूपाची वाटचाल आणि विचारविनिमयाच्या माध्यमातून कशाप्रकारे मार्ग काढला जावू शकतो, इतरही पर्याय समोर आणले आहेत. तसेच या विषयावर नव्याने विचार आणि कृती करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
डॉ. सोमिनाथ घोळवे, ग्रामीण समाजव्यवस्थेचे अभ्यासक, द युनिक फाउंडेशन, पुणे
Dipak Kasale
02 Oct 2023 05 30 AM
जगण्याच्या धडपडीत निसर्गाशी जैव नाते निर्माण होऊन त्यातून मिळालेला अनुभव हेही ज्ञान आहे याचा आत्मविश्वास बसवंत विठाबाई बाबाराव यांना चळवळीतील सहभागातून मिळाला आहे. पुढे त्यांना पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आणि ते लिहिते झाले. त्यातूनच पर्यावरणाकडे केवळ एक सुटा विषय म्हणून न पाहता आर्थिक, सामाजिक, राजकीय संरचणांशी जोडून समग्रपणे पाहण्याची जीवनदृष्टीच समोर आली. खालून वर आणि वरून खाली अशी द्वैती विभागनी भेदून अनुभव आणि ज्ञान एकात्वात साकारले... बसवंत विठाबाई बाबाराव यांचे लिखाण एकत्र बांधणारे 'हरितदृष्टी' हे पुस्तक एकाअर्थाने स्वतंत्र दृष्टी आहे, की जी मानवी शोषणासह निसर्गाच्या शोषणाचाही विचार करणारी आहे. त्यामुळेच 'हरितदृष्टी' हे पुस्तक हरितीने आजवर प्रकाशित केलेल्या पुस्तकांमधील एक आगळे वेगळे पुस्तक आहे. वाचक त्याचे नक्कीच स्वागत करतील असे वाटते.
- दिपक कसाळे
Rajashri Injamuri
02 Sep 2023 05 30 AM
पर्यावरण बदलासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ही राजकीय इच्छाशक्ती आहे, जी सध्याच्या व्यवस्थेत अभावानेच आढळून येते, हे या पुस्तकात छान पद्धतीने मांडले गेले आहे.
पर्यावरण हा विषय माणसाच्या सर्व क्षेत्रांशी संबंधित आहे. पर्यावरणीय विषयाचे व्यापक आकलनासाठी ही आतापर्यंतच्या पुस्तकातील एक महत्वपूर्ण मैलाचा टप्पा म्हणता येईल.