Summary of the Book
नमस्कार,
कै.अनंत खाडिलकर म्हणजे माझे सासरे. नात्याने मी त्यांची सून असले तरी आमचं नातं हे वडील मुलीचंच होतं ! त्यांनी आमच्यावर आणि नातवंडावर भरभरून माया केली. त्यांचा विद्वत्तापूर्ण आणि सात्विक सहवास आम्हाला लाभला त्याबद्दल मी परमेश्वराची अत्यंत ऋणी राहीन.सदर काव्यसंग्रहात समाविस्ष्ट केलेल्या कविता ह्या त्यांच्या उच्च आणि समृद्ध विचारसारणीच्या द्योतक आहेत. राजकारण, स्त्री शक्ती, देशभक्ती, बालसाहित्य,भावगीत, भक्तीगीत, प्रेमगीत, निसर्ग, पार्यावरण असे अनेक भावाविष्कार ह्या कविता संग्रहात तुम्हाला
वाचायला मिळतील.
आयुष्यातील विविध पैलूंना, समाजातील विविध मुद्यांना स्पर्श करत त्यांना कवितेच्या स्वरुपात मांडताना पप्पांनी आपल्यासाठी साहित्याचा एक अनमोल ठेवा ठेवला आहे. हाच ठेवा आज तुमच्या समोर आणताना मला खूप आनंद होत आहे.
तुम्हा सगळ्यांना तो आवडेल अशी आशा व्यक्त करते.