Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
बीड हा दुष्काळाच्या छायेतला मागास जिल्हा. पाऊस कमी. सिंचन व्यवस्था नाही, त्यामुळे शेती नाही. उद्योगधंदे नाहीत, त्यामुळे हाताला काम नाही. मग माणसाने पोट भरावं कसं? या परिस्थितीत जगण्यासाठी इथली माणसं उस तोडायला जातात. सांगली-कोल्हापूरपासून पार कर्नाटकपर्यंत. सहा सहा महिने बायको पोरांसह तिकडेच राहतात. त्यांच्या राहण्याला ‘राहणं' कसं म्हणणार? फाटक्या-तुटक्या उघड्या खोपट्यातला तो संसार. पहाटे तीनपासून काम संपेपर्यंत गुरासारखं राबायचं. काहीबाही शिजवून पोटात ढकलायचं. रानटी प्राणी आणि रानटी माणसं यांच्या भीतीखाली जगायचं. कामगार म्हणून नोंद नसल्याने ना वेतननिश्चिती, ना बोनस, ना पेन्शन. पोराबाळांच्या शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या सगळ्या वाटा खुंटलेल्या जणू गुलामाचं जिणंच. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षं झाली. पण लोकांचं तोंड गोड करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या उसतोड कामगाराचं आयुष्य मात्र कडूजार आहे. ‘भारत आमचाही देश आहे आणि आम्हाला इतरांसारखं मानाचं जगणं हवं आहे', असं त्यांचं म्हणणं आहे. उसतोड कामागारांचे प्रश्न, त्यांच्या बायकामुलांच्या समस्या, त्यांचं जिणं सुधारावं यासाठी शासनस्तरावर झालेले प्रयत्न, ‘शांतिवन' या संस्थेमार्फत राबवले जाणारे उपक्रम आणि मागण्या यांची दोन दशकांतील कामाच्या आधारे चर्चा करणारं पुस्तक.
खुप छान सर एवढंच म्हणेन कारण आपलं कार्य म्हणजे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे....
संतोष वंजारे
19 Aug 2023 07 57 AM
ऊस तोडणी मजुरांचं वाचून होतं. पण ह्या पुस्तकांतून त्यांच्या वेदना, त्यांचे हाल काय काय होतं असतात हे माहीत झालं.आणि खरचं आहे की, ७५ वर्ष झालेभारत देश स्वतंत्र होऊन मात्र ह्या कष्टकरी मजुरांचे जे आजही हाल होतात ते योग्य नाही आणि सरकारचं लक्ष नाही हे दुर्दैव आहे. सर आपणांस..👏👏👏✍️