Hard Copy Price:
25% OFF R 275R 206
/ $
2.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
दोनेक वर्षांपूर्वीचा कोरोना काळ हा भयप्रद आणि अस्वस्थकारक होता. या काळात माणसांचा सार्वजनिक वावर नाहीसा झाला. लोक या काळात स्वतःशी बोलू लागले. संवाद करू लागले. गतकाळाला आठवू लागले. त्यामुळे आत्मपर लेखनाला बहर आला. अशा स्मरणरंजनातून काही सर्जनशील साहित्यकृतींचा जन्म झाला. यापैकीच कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक श्री. उत्तम फराकटे यांनी कोरोना काळात स्वतःच्या बालपणाविषयी केलेले लेखन 'हिंगणमिठ्ठा' या ललितसंग्रहात समाविष्ट आहे. हे त्यांचे आत्मपर स्वरूपाचे लेखन आहे. फराकटे यांच्या या ललितगद्यातील वर्णनप्रदेश काळ चाळीस वर्षापूर्वीचा आणि त्याचा सामाजिक भूगोल आहे, कोल्हापूर. चाळीसेक वर्षांपूर्वीची कोल्हापुरातील समाजचित्रे या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. ही समाजचित्रे लेखकांच्या बालपणाशी निगडित आहेत. चाळीस वर्षांपूर्वीच्या कोल्हापुरातील कुटुंबजीवन, लोकजीवन, लोकव्यवहार तसेच जीवनशैलीचे चित्तवेधक असे हे वर्णनकथन आहे. निवेदकाच्या बालपणातील खेळ, खाद्य संस्कृती व मौजमजेच्या कहाण्या या लेखनात आहेत. भूतकाळात रसरसून सानंद उपभोगलेल्या काळाच्या या सुखद स्मृती आहेत.
Pratiksha Patil
17 Jan 2025 05 02 PM
सुमारे चार दशकांपूर्वीच्या बालपण-तरुणपणावर विविधरंगी स्मृतींना खुमासदार उजाळा देण्याचं काम 'हिंगणमिठ्ठा'तून नक्कीच साध्य झालंय. गतकाळातील खेळ, सणवार, व्यक्तिचित्रे, सामाजिक व्यवस्था यांविषयी लेखक भरभरून लिहिताना प्रत्ययकारी दर्शन घडवतो. या पुस्तकाची भाषाशैली ही लालित्यपूर्ण व नर्मविनोदी अंगांची असून सोबत निरिक्षणशक्तीच्या प्रखर सामर्थ्याने सर्व प्रकरणे साजिवंत प्रकरणांची नावे तर बहारदारच. या सर्वांमुळे हे पुस्तक तमाम या पसंतीस उतरले आहे.
Vishal mahajan
17 Jan 2025 05 01 PM
हिंगणमिठ्ठा' हे पुस्तक वाचताना मला अक्षरक्षः खिळवून ठेवलं. लेखक उत्तम फराकटे यांनी अत्यंत बारकाईने वर्णन केलेला परिसर, सणवार, जयंत्या, यात्रा, खेळ हे सर्व मी स्वतः अनुभवले आहेत. ते सर्व अत्यंत तपशिलात आणि साध्या, ओघवत्या शैलीत वैशिष्ट्यपूर्णरीत्या मांडल्यामुळे अत्यंत वाचनीय झाले आहे.
Nipun kalekar
17 Jan 2025 04 59 PM
*" हिंगणमिठ्ठा “ ची चव लय भारी !*
*उत्तम फराकटे यांच 'हिंगणमिठ्ठा' हे पुस्तक 'कुछ खट्टा और कुछ मीठा भूतकाळासारखं !*
तसे पाहिले तर आठवणी कशाही येतात. झिरमिर किंवा धो-धो पावसासारख्या ! त्या ओंजळीत पकडून ठेवता येत नसतात. मात्र उत्तम फराकटे यांनी ते अवघड काम सहजी केलेले आहे. ओंजळीत पकडून ठेवण्यापेक्षा त्यांना शब्दबद्ध करणे हे त्याहून कठीण काम असते. ते जितके साहित्यिकांना किंवा साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांना जमणार नाही, तितके किंबहुना त्याहून अधिक परिणामकारक जादुई काम फराकटे यांनी केले आहे. त्यामुळे 'हिंगणमिठ्ठा' वाचताना वाचणाऱ्याच्याच नव्हे, तर ऐकणाऱ्याच्याही आठवणींना पाणी सुटल्याशिवाय राहणार
Nilesh varne
17 Jan 2025 04 57 PM
हिंगणमिठ्ठा 'कोल्हापुरचे समृद्ध संस्कार आणि सुखद, अविस्मरणीय आठवणींचा अनमोल साठा !
-----मुखपृष्ठ-- आकर्षक आणि समर्पक
पुरवून, पुरवून, चाखत,माखत,चविचवीने आस्वाद घेत, घेत,' हिंगणमिठ्ठा 'संपवताना जो परमांनंद मिळतो; अगदि तसाच आनंद घेत, घेत पुस्तक वाचून संपवलं! कोल्हापूरातील गल्ली, पेठामधील प्रतेकाच्या मनातील साधर्म्य आठवणीना छानच
उजाळा !
धन्यवाद !
Akshay Heremath
17 Jan 2025 04 56 PM
कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक, 'आयर्नमॅन' उत्तम फराकटे यांचं 'हिंगणमिठ्ठा' हे पुस्तक वाचल्यावर मी अक्षरशः भारावून गेलो. आज चाळीस-पन्नाशीत असलेल्या आणि त्या पुढच्या लोकांनी अनुभवलेल्या त्यांच्या बालपणातील आणि जुन्या कोल्हापुरातील त्या वेळच्या कालखंडाचा आरसाच समोर धरल्यासारखे वाटले. हॅट्स ऑफ ! पुस्तक खाली ठेववत नाही. महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात स्वानुभवाची परिणती येईल.
Rupesh Patil
17 Jan 2025 04 38 PM
उत्तम फराकटे लिखित हे पुस्तक वाचत असताना आपल्याला पारंपारिक सण आठवतात तसेच आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा मिळतो.आत्ताच्या पिढीशी तुलना करता किती सुखकर आपले बालपण होते. कोणत्याही गोष्टीची फिकिर न करता हवे तसे बालपण जगता आले हे पुस्तक वाचताक्षणी लक्षात येते.आपणही हे पुस्तक नक्की वाचावे.
Mansee chavhan
17 Jan 2025 04 36 PM
आयुष्याच्या संध्याकाळी माणसाला जगण्यासाठी कशाची गरज असते, हे जर कोणी विचारलं तर मला असे वाटते की तुमच्या बरोबर एखादी असलेली कलेची. कलेसारखा जगण्यासाठीचा दुसरा कुठलाही आनंद असणार नाही, असूच शकणार नाही. हे सगळं सांगण्याचा प्रपंच एवढ्यासाठीच की काल कोल्हापुरातील एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक श्री उत्तम फराकटे यांच्या *हिंगणमिठ्ठा* या पुस्तकाच्या प्रकाशनाला जाण्याचा योग आला. या कार्यक्रमाला जायचं असं मी मागच्याच आठवड्यात जेव्हा मला फेसबुक वरून कळलं त्यावेळेला मी ठरवलं होतं. मुळात *हिंगणमिठ्ठा* या नावानेच मला जास्त आकर्षित केलं होतं. आणि नावच एव्हढं भारी आणि तोंडाला पाणी आणणार,तर आतला मजकूर किंवा आत व्यक्त केलेले लेखकांने मनोगत किती छान असेल अशी मला उत्सुकता राहिली होती. मनोगत वाचून झाल तस मी पुस्तक वाचला सूर केल तस आपली कोल्हापुरी भाषेत लई भारी ,पुस्वांतर तर वांडच असणार याची प्रचिती पानोपानी येतच राहाली. जबरदस्त पुस्तक. एक हाती संपवले.
Rithesh Desai
17 Jan 2025 04 35 PM
हिंगणमिठ्ठा* पंचगंगेच्या काठी दाटीवाटीने वसलेल्या कोल्हापूरातील जुन्या पेठा, गल्ल्यांमधील चाळीस एक वर्षांपूर्वीं च्या बालपण ते षोडश वर्षीय अवस्थेतील शालेय, कौंटुबिक, सामाजिक, वैयक्तिक आठवांचा रसभरीत, खुमासदार *हींगणमिठ्ठा !* चिंचेच्या केवळ आठवणीने तोंडाला पाणी सुटते. आठवणीही तशाच. कडू, गोड …… पण रमायला तर होतंच !
Bhushan mithari
17 Jan 2025 04 34 PM
हिंगणमिठ्ठा* पंचगंगेच्या काठी दाटीवाटीने वसलेल्या कोल्हापूरातील जुन्या पेठा, गल्ल्यांमधील चाळीस एक वर्षांपूर्वीं च्या बालपण ते षोडश वर्षीय अवस्थेतील शालेय, कौंटुबिक, सामाजिक, वैयक्तिक आठवांचा रसभरीत, खुमासदार *हींगणमिठ्ठा !* चिंचेच्या केवळ आठवणीने तोंडाला पाणी सुटते. आठवणीही तशाच. कडू, गोड …… पण रमायला तर होतंच !
Sourabh ramchandr patil
17 Jan 2025 04 31 PM
हिंगणमिठ्ठा* हे पुस्तक हाती आले; ते वाचून पूर्ण झाल्यावरच खाली ठेवले. मी त्याच परिसरात लहानाचा मोठा झालो असल्याने त्या गल्ल्यांमधुन फेरफटका मारून आलो आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खर तर या पुस्तकाचे नाव "आठवणीतील मोती" असायला हवे होते कारण आठवणीतला मोती जसा जसा सापडला तसा तसा तो माळेत ओवला आहे. लेखकांची भाषा ही अत्यंत साधी आणि ओघवती असल्याने पुस्तक कोठेही कंटाळवाणे झालेले नाही. त्यांच्या आठवणीला ताण देऊन आणखीन काही मोती सापडतात काय ते पाहून त्याची आणखीन एखाद दुसरी माळ होती काय ते पाहावे. लेखक जरी बांधकाम व्यवसायातील असले तरीही त्यांच्यामध्ये एक सिद्धहस्त लेखक दडलेला आहे. त्यांच्या हातून अशीच लेखनसेवा घडावी अशी प्रार्थना...
Sanket kalekar
11 Jan 2025 05 16 PM
*आयुष्याच्या संध्याकाळी माणसाला जगण्यासाठी कशाची गरज असते, हे जर कोणी विचारलं तर मला असे वाटते की तुमच्या बरोबर एखादी असलेली कलेची.*
कलेसारखा जगण्यासाठीचा दुसरा कुठलाही आनंद असणार नाही, असूच शकणार नाही.
हे सगळं सांगण्याचा प्रपंच एवढ्यासाठीच की काल कोल्हापुरातील एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक श्री उत्तम फराकटे यांच्या *हिंगणमिठ्ठा* या पुस्तकाच्या प्रकाशनाला जाण्याचा योग आला. या कार्यक्रमाला जायचं असं मी मागच्याच आठवड्यात जेव्हा मला फेसबुक वरून कळलं त्यावेळेला मी ठरवलं होतं. मुळात *हिंगणमिठ्ठा* या नावानेच मला जास्त आकर्षित केलं होतं. आणि नावच एव्हढं भारी आणि तोंडाला पाणी आणणार,तर आतला मजकूर किंवा आत व्यक्त केलेले लेखकांने मनोगत किती छान असेल अशी मला उत्सुकता राहिली होती.
आणि म्हणून मग मी आठवणीने कालच्या या कार्यक्रमाला आलो आणि खरंच माझी पूर्ण अपेक्षापूर्ती झाली. पुस्तक वाचण्याच्या ही अगोदर येथील सर्व मान्यवर वक्त्यांनी विशेषतः डांगे सर, डॉक्टर संतोष प्रभू आणि लेखक स्वतः श्री उत्तम फराकटे यांनी जे एकेक अनुभव सांगितले, त्यावरून माझ्या लक्षात आलं की हे पुस्तक एकदम भन्नाट, म्हणजे आपल्या कोल्हापुरी भाषेत लै भारी, वांड असणार. आणि रात्री मी ते पुस्तक घरी गेल्यानंतर वाचायला घेतलं आणि खरोखरच मला जाणवलं की जे वाटलं तसं ते पुस्तक आहे. आपल्या आयुष्यात लहानपणापासून येणारे जे काही अनुभव असतात, अनुभूती असतात त्या प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार प्रमाणात सारख्या असतातच.
उदा... कटाकटी,गोड गोड बोला,पी ढभाक,बोल पी पी,आखरी रास्ता... जवळ पास सर्व लिखाण हृदयाच्या जवळचच जाणवणारे.आपण प्रत्यक्ष जगतोय असे भासणारे... पण सर्वांनाच काय त्याची मांडणी शब्दात करतात येते असं नाही. आणि नेमकं ते श्री उत्तम फराकटे यांना खूप छानच पद्धतीने जमले. उदाहरणार्थ शिव्या मित्रांना देणे, शाळेत असताना मित्रांच्या वडिलांवरून मित्रांना हाक मारण्याची एक पद्धत होती. त्यामुळे निर्माण झालेले घोळ, त्याची मजा आता जाणवते पण त्यावेळेला जी काही भीती आणि पळता भुई झालेली असती या सगळ्याचं वर्णन अत्यंत बोली भाषेत श्री उत्तम फराकटे यांनी केलेले आहे. *या पुस्तकाचं कौतुक किंवा ते इतकं आपलंसं का वाटत याच कारण काय असेल, तर याचं जे लिखाण आहे ना ते लिखाण पूर्ण बोली भाषेत झाले आहे. म्हणजे आपण एकमेकांशी, मोकळे पणाने कसे बोलतो ना, त्याच भाषेत या पुस्तकाचे लिखाण झालंय. उगाच अलंकारिक भाषा* *वापरून आशयाचा बट्ट्याबोळ केलेला नाही.*
*किंवा मग ती कृत्रिमता ही आलेली नाही*
अनेक शिक्षकांच्या बरोबरचे प्रसंग, गल्लीतील प्रसंग, पेठेतील प्रसंग, आणि त्यानंतर घरातील आई-वडील त्यांचे संस्कार *या संदर्भातले आलेले उल्लेख असं वाचताना क्षणभर असं वाटतं की अरे हे आपणच जगलेलो आहोत.* इतक छान पुस्तक श्री उत्तम फराकटे यांनी लिहिलेल आहे. असेच लिखाण त्यांचं वारंवार येत जावो आणि आम्हाला आनंद देत जावो. आणि म्हणून मी म्हटले की त्यांच्याकडची ही लेखनाची कला जी नक्की त्यांच्याकडे लहानपणापासून होती,फक्त ती पुस्तकरूपाने पूर्ण व्हायची वेळ परमेश्वराने आताची लिहिली असणार.म्हणूनच असंख्य अडचणींवर मात करत त्यांनी ती पूर्ण केली. *आणि म्हणूनच नक्कीच मला असं वाटतं की प्रचंड घाई गडबडीच्या अशा त्यांच्या बांधकाम व्यवसायाच्या कामातून लेखनाची नव्याने गवसलेली ही कला त्यांना उर्वरित आयुष्यातील संध्याकाळ नक्कीच मनस्वी आनंदात घालवण्यास मदत होईल* पुन्हा एकदा खूप खूप आभार श्री उत्तम फराकटे यांचे.कोल्हापूर वासियांना तुम्ही पुन्हा एकदा आमच्याही लहानपणाची,आमच्याही बालपणाची, आमच्याही पेठेतील असण्याची, शाळेतील सर्व गोष्टींची आठवण करून दिलीत खूप खूप धन्यवाद....
Abhijeet Dantal
11 Jan 2025 05 15 PM
उत्तम फराकटे लिखित हे पुस्तक वाचत असताना आपल्याला पारंपारिक सण आठवतात तसेच आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा मिळतो.आत्ताच्या पिढीशी तुलना करता किती सुखकर आपले बालपण होते. कोणत्याही गोष्टीची फिकिर न करता हवे तसे बालपण जगता आले हे पुस्तक वाचताक्षणी लक्षात येते.आपणही हे पुस्तक नक्की वाचावे.
Guruprasad Varne
11 Jan 2025 05 11 PM
आयुष्याच्या संध्याकाळी माणसाला जगण्यासाठी कशाची गरज असते, हे जर कोणी विचारलं तर मला असे वाटते की तुमच्या बरोबर एखादी असलेली कलेची.
कलेसारखा जगण्यासाठीचा दुसरा कुठलाही आनंद असणार नाही, असूच शकणार नाही.
हे सगळं सांगण्याचा प्रपंच एवढ्यासाठीच की काल कोल्हापुरातील एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक श्री उत्तम फराकटे यांच्या *हिंगणमिठ्ठा* या पुस्तकाच्या प्रकाशनाला जाण्याचा योग आला. या कार्यक्रमाला जायचं असं मी मागच्याच आठवड्यात जेव्हा मला फेसबुक वरून कळलं त्यावेळेला मी ठरवलं होतं. मुळात *हिंगणमिठ्ठा* या नावानेच मला जास्त आकर्षित केलं होतं. आणि नावच एव्हढं भारी आणि तोंडाला पाणी आणणार,तर आतला मजकूर किंवा आत व्यक्त केलेले लेखकांने मनोगत किती छान असेल अशी मला उत्सुकता राहिली होती. मनोगत वाचून झाल तस मी पुस्तक वाचला सूर केल तस आपली कोल्हापुरी भाषेत लई भारी ,पुस्वांतर तर वांडच असणार याची प्रचिती पानोपानी येतच राहाली. जबरदस्त पुस्तक. एक हाती संपवले.
Swati dantal
11 Jan 2025 05 03 PM
हिंगणमिठ्ठा* पंचगंगेच्या काठी दाटीवाटीने वसलेल्या कोल्हापूरातील जुन्या पेठा, गल्ल्यांमधील चाळीस एक वर्षांपूर्वीं च्या बालपण ते षोडश वर्षीय अवस्थेतील शालेय, कौंटुबिक, सामाजिक, वैयक्तिक आठवांचा रसभरीत, खुमासदार *हींगणमिठ्ठा !*चिंचेच्या केवळ आठवणीने तोंडाला पाणी सुटते. आठवणीही तशाच. कडू, गोड …… पण रमायला तर होतंच.!
Navin vinayak Dantal
09 Jan 2025 06 42 PM
हिंगणमिट्टा हे एक पुस्तक नसून ते एक लहानपणी चे विश्व् काय होते काय गमती जमती होत्या याची पुन्हा एकदा आठवण करून देते. आपल्या हिंदू संस्कृती मध्ये जे काही सणवार आहेत आणि लहानपणी त्यावेळी त्या सणना मध्ये केल्या सर्व गंमती ची आठवणं करून देणारे पुस्तकं आहेत. लहानपण काय होते याची पूर्ण आठवण घडते पुस्तकं वाचत असताना म्हणजे पूर्ण आपण त्या काळात जातो. पुस्तकं वाचताना एवढे मस्त उत्तम फराकटे यांनी हे पुस्तक लिखाण केले आहे. खरंच सर्वांनी खरेदी करून हे वाचावे असं मला वाटते.
Subhash chavan
20 Sep 2024 08 20 PM
*हिंगणमिठ्ठा* हे पुस्तक हाती आले; ते वाचून पूर्ण झाल्यावरच खाली ठेवले. मी त्याच परिसरात लहानाचा मोठा झालो असल्याने त्या गल्ल्यांमधुन फेरफटका मारून आलो आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खर तर या पुस्तकाचे नाव "आठवणीतील मोती" असायला हवे होते कारण आठवणीतला मोती जसा जसा सापडला तसा तसा तो माळेत ओवला आहे. लेखकांची भाषा ही अत्यंत साधी आणि ओघवती असल्याने पुस्तक कोठेही कंटाळवाणे झालेले नाही. त्यांच्या आठवणीला ताण देऊन आणखीन काही मोती सापडतात काय ते पाहून त्याची आणखीन एखाद दुसरी माळ होती काय ते पाहावे. लेखक जरी बांधकाम व्यवसायातील असले तरीही त्यांच्यामध्ये एक सिद्धहस्त लेखक दडलेला आहे. त्यांच्या हातून अशीच लेखनसेवा घडावी अशी प्रार्थना...
Vikram
24 Aug 2024 11 55 AM
*हिंगणमिठ्ठा*
पंचगंगेच्या काठी दाटीवाटीने वसलेल्या कोल्हापूरातील जुन्या पेठा, गल्ल्यांमधील चाळीस एक वर्षांपूर्वीं च्या बालपण ते षोडश वर्षीय अवस्थेतील शालेय, कौंटुबिक, सामाजिक, वैयक्तिक आठवांचा रसभरीत, खुमासदार *हींगणमिठ्ठा !*
चिंचेच्या केवळ आठवणीने तोंडाला पाणी सुटते. आठवणीही तशाच. कडू, गोड …… पण रमायला तर होतंच !
Sheetal
24 Aug 2024 11 45 AM
लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी चिंचेचे गोळे खाल्ले असतील. कोवळ्या किंवा गाभुळलेल्या चिंचांचे तुकडे करून त्यातील चिंचोके काढून त्यात तिखट मीठ घालून गूळ, कडीपत्ता, लसूण आणि हिंग घालून आंबटगोड गोळे तयार केले जातात. (तोंडाला पाणी सुटलं असेल ना!) याच गोळ्यांना हिंगणमिठ्ठा म्हणून ओळख आहे. काही ठिकाणी याला खट्टामीठा असेही म्हटले जाते. आजच्या पुस्तकातून हाच हिंगणमिठ्ठा आपल्याला बालपणात घेऊन जाणार आहे....आंबटकडूगोड आठवणींसह...
भूतकाळ हा घडून गेलेला असतो. वर्तमान काळ आज घडत असतो. आजच्या वर्तमानाचा उद्या भूतकाळ होणार असतो. तसाच एकेकाळचा वर्तमान म्हणजेच आजचा भूतकाळ हा एका अर्थाने हिंगणमिठ्ठा आहे. आपल्या आठवणी सुद्धा अशाच काही कडू काही आंबट काही गोड असतात. बालपण ते किशोर अवस्था हा सर्वांच्याच आयुष्यातला स्वप्नमय कालखंड. त्यातील आठवणी आयुष्यभर घट्टपणे आपल्या मनात बिलगून राहतात. आजच्या पुस्तकामध्ये कोल्हापुरातील पेठांमधला भूतकाळ आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा करण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.
तसे पाहिले तर आठवणी कशाही बरसत असतात. कधी धो-धो पावसासारख्या तर कधी लहानशी एखादी सर यावी तशा. ओंजळीत पकडावं म्हटलं तर ते शक्य नसतं. पण हिंगणमिठ्ठाच्या लेखकाने या आठवणीना घट्ट पकडून ठेवले आहे. त्यांचं हे पहिलंच पुस्तक असलं तरी एखाद्या प्रथितयश साहित्यिकाप्रमाणे या आठवणी त्यांनी शब्दबद्ध केलेल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे लेखसंग्रह आहे. अनुभूतीची प्रामाणिकता हा जर *उत्तम साहित्याचा निकष* मानला गेला तर *उत्तम फराकटे* यांचा हा लेख संग्रह *उत्कृष्ट साहित्याचा एक नमुना* म्हणावा लागेल. भाषा अत्यंत सरळ, साधी आणि ओघवती आहे आणि भूतकाळातील प्रसंग जसेच्या तसे उभी करणारी आहे. या पुस्तकात कोल्हापुरातील पेठांमधील सामाजिक परिस्थिती, जीवनमान आणि लोकजीवन चित्रित केले आहे.
आर्थिक सुबत्ता नसली तरी लोक एकमेकांना धरून सहजीवन व्यतीत करत होते, याचे वास्तव चित्रण या पुस्तकात आहे. काही अस्सल कोल्हापुरी शब्द या पुस्तकाची शोभा वाढवतात.
बारडी, मोळा, डांब, चावी, पीssढबाक, घुमकं, कैचाळ, पिपाणी, संबळ, दिमड्या, मेपटी, हलगी असे शब्द स्थानिक बोलीभाषेचा डौल वाढवतात.
या पुस्तकात एकूण २६ लेख आहेत. या लेखांची नावच बघा किती वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
दिल्ली ते गल्ली
कटाकटी
बोंबला रे बोंबला
रंग नवतीचे
गोड गोड बोला
नीट बोल रे गाढवा
सोनं
हर हर महादेव
पुढच्या वर्षी लवकर या
रंग वाटले कुणी
काला
बैलोबा
वटवट सावित्री
अरे ते व्हय? ते साप सोडतंय !ढोल पिपी
इडियट बॉक्स
पी ढबाक
आखरी रास्ता
शाईचा पेन पेचाचे टोपण
खेळ मांडला
हर हर गंगे!
दारोदारी
लग्न बघावे करून
शाळा सुटली, पाटी फुटली मामाच्या गावाला जाऊया
विमान विमान चिठ्ठी दे, माळ्यावरची बुट्टी दे!
या लेखांचे शीर्षक बघितले तरी जुन्या कोल्हापुरातला रांगडा बाज आपल्या लक्षात येईल. पुस्तकातील काळ साधारणपणे ४० वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळची कोल्हापुरातील सामाजिक परिस्थिती, कुटुंबजीवन, लोक व्यवहार आणि जीवनशैली यासह लहान मुलांचे खेळ, खाद्य संस्कृती आणि मौजमजेच्या कहाण्यासुद्धा या पुस्तकामध्ये आहेत. थोडक्यात कोल्हापूरचा स्थानिक इतिहास या लेखनात प्रतिबिंबित झाला आहे. पेठा आणि गल्ल्या हे कोल्हापूरचे वैशिष्ट्य. *शिवजयंती पासून मोहरम पर्यंत सर्व सण सर्वांनी साजरे करायचे असतात*, हा इथला अलिखित नियम. प्रेमळ अघळ-पगळ वागणं, स्पष्टवक्तेपणा, भाषेचा लहेजा, सामाजिक एकोपा ही सगळी वैशिष्ट्य या लेखांमधून आपल्या समोर येतात. त्याचबरोबर भूतकाळातील सुखद आठवणी हव्याहव्याशा असल्या तरी आज वर्तमान बदलत आहे आणि ते फारसे सुखावह नाही. प्रेमळपणाची जागा इव्हेंट मॅनेजमेंट आणि हलगी ची जागा डॉल्बी अशा उपकरणांनी घेतल्यामुळे बदलत जाणारे समाजवास्तव आणि स्मरणरंजन याचे चपखल चित्रण या पुस्तकात आले आहे.
यातील काही किस्से किंवा काही वैशिष्ट्ये उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही.
राजीव मांगोरे
18 Apr 2024 07 01 PM
हिंगणमिट्टा हे एक पुस्तक नसून ते एक लहानपणी चे विश्व् काय होते काय गमती जमती होत्या याची पुन्हा एकदा आठवण करून देते. आपल्या हिंदू संस्कृती मध्ये जे काही सणवार आहेत आणि लहानपणी त्यावेळी त्या सणना मध्ये केल्या सर्व गंमती ची आठवणं करून देणारे पुस्तकं आहेत. लहानपण काय होते याची पूर्ण आठवण घडते पुस्तकं वाचत असताना म्हणजे पूर्ण आपण त्या काळात जातो. पुस्तकं वाचताना एवढे मस्त उत्तम फराकटे यांनी हे पुस्तक लिखाण केले आहे. खरंच सर्वांनी खरेदी करून हे वाचावे असं मला वाटते.
Suvarna dube
27 Mar 2024 04 11 PM
उत्तम फराकटे लिखित हे पुस्तक वाचत असताना आपल्याला पारंपारिक सण आठवतात तसेच आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा मिळतो.आत्ताच्या पिढीशी तुलना करता किती सुखकर आपले बालपण होते. कोणत्याही गोष्टीची फिकिर न करता हवे तसे बालपण जगता आले हे पुस्तक वाचताक्षणी लक्षात येते.आपणही हे पुस्तक नक्की वाचावे.