Summary of the Book
महाभारत हे महाकाव्य भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे. कृष्ण, अर्जुन, युधिष्ठिर, भीम, कर्ण, दुर्योधन, भीष्म, द्रोणाचार्य ही यातील महत्वाच्या व्यक्ती आहेत. यातील बहुतेकांची व्यक्तिचित्रे वाचायला मिलता. मात्र बलशाली भीमाबद्दल नेहमीच्या घटना सोडून फारशी माहिती नसते. ती उणीव डॉ. डी. डी. शिंदे यांनी दूर केली आहे. त्यांच्या 'महाबलाढ्य भीमसेन' मधून भीमाचे चरित्र समजते. भीम देखणा, पराक्रमी, बलशाली, भीम पांडवांचा आधारस्तंभ होता. विद्वान, मुत्सद्दी, तल्लख बुद्धी, धाडसी, प्रेमळ होता. अनेक राक्षस, जुलमी राजे यांना त्यांनी ठार केले. महाभारतातील युद्धात त्याने अतुलनीय पराक्रम केला. संकटसमयी त्यानेच द्रौपदीचे रक्षण केले. महाभारतातील एक अष्टपैलू व्यक्तीमत्वाची स्वतंत्र ओळख यातून होते.