Summary of the Book
पंचप्राण कोणते ? सप्तसाधू कोणते ? नाटकाची सहा
अंगे कोणती ? छत्तीस यक्षिणी कोणत्या ? काळ्या बाजाराचे
चाळीस प्रकार कोणते ? छप्पन्न भाषा कोणत्या ? ब्याण्णव
मूलतत्वे कोणती ? इ. विविध विषयांतील माहिती
'संख्या संकेत कोशात' एकत्रितपणे वाचावयास मिळेल.
लेखकाने साडेतीनशेच्यावर विविध विषयांवरील ग्रंथांचे
संदर्भ घेऊन पांच हजाराचेवर संकेतांची माहिती या ग्रंथात
एकत्रित केलेली आहे. वेद, उपनिषदे, धर्मशास्त्र,
भक्तीशास्त्र, पुराणे, योगशास्त्र, वैद्यकशास्त्र, विविध कोश
अशा असंख्य विषयांवरील ग्रंथांचा अभ्यास करून
त्यांतील 'संकेत-नवनीत' वाचकांचे हाती श्री. हणमंते यांनी
दिले आहे. विषयांच्या वैविध्यामुळे केवळ संदर्भ ग्रंथ असे
स्वरूप झाले आहे.