Summary of the Book
काही निर्मितिप्रिय आणि कल्पक विचारांचे सुहृद एकत्र आले आणि 'प्रणवतीर्थ' चा जन्म झाला. आधुनिक जीवनपद्धतीच्या झपाट्याने बदलत असलेल्या समाजजीवनातून उध्दभवणाऱ्या समस्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न ' प्रणवतीर्थ' गेली अनेक वर्ष करत आहे. सकारात्मक भूमिकेतून माणसाला मार्गदर्शक व मदत करत आहे. प्रणवतीर्थ जुन्या संस्कारांचे महत्व, त्यातील सामर्थ्य ओळखून, सामाजिक आणि वैचारिक बदल तसेच बदलत चाललेल्या नीतिमूल्यांची जाणीव ठेवून आजच्या काळाला साजेसे नवे रूप घेणारी विचारधारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 'प्रणवगीताई' चे प्रकाशन त्याच वाटचालीचा एकभाग आहे. समाजहितासाठी आवश्यक प्रबोधन आणि सुयोग्य परिवर्तनासाठी प्रणवतीर्थने एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. वैदिक आर्याची जीवनपद्धती, तत्कालीन समाजजीवन, उपासेनेच्या संकल्पना, शिक्षणपद्धती यांचा अभ्यास करून व ते आदर्श डोळ्यांपुढे ठेऊन सासवडजवळील निसर्गरम्य 'ओंकार व्हॅली' मध्ये कृष्णमंदिर, ध्यानमंदिर, कायाकल्प केंद्र, वृद्धाश्रम आणि वसतिगृहासह प्रशाला साकार करण्याची भव्य योजना प्रणवतीर्थने आखली आहे. अवार्चीन पंपर व कालानुरूप आधुनिक जीवनशैली यांचा संगम साधणाऱ्या विचारमंथनातून सर्वानीगीण विकास होण्याच्या दृष्टीने या सर्व प्रकापांची उभारणी होत आहे.