Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
17% OFFR 150R
125
/ $
1.60
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Start to finish in one sitting
Very enriching experience...🙏
Vishal Raje
09 Jun 2023 05 30 AM
श्रीयुत विशाल राजे सर ,
को यात्री वाचले ..... आणि कोविड काळातील अनेक घटना ,कटू आठवणी डोळ्यासमोर जशाच्या तश्या उभ्या राहिल्या ... आणि परत एकदा तीव्रतेने जाणवले कि वेदनेचे आणि माणसाचे असे एक अतूट नाते आहे आणि तो अनुभव जितका वैयक्तिक आहे तितकाच तो सार्वजनिक पण आहे, मग ती वेदना कोणत्याही स्वरूपाची असो ...निरंतर जगण्यात ती आपली पाठ सोडत नाही .... कोविड काळातला तुम्ही सांगितलेला प्रत्येक अनुभव म्हणूनंच खरा आणि जिवंत वाटतो आणि असे वाटायला लावण्याची ताकद तुमच्या शब्दात आहे .... मला अजून एका अर्थाने हे पुस्तक अशा कारणासाठी आवडले कि एका सामान्य रुग्णाचे अनुभव जरी तुमच्यासारखेच होते पण तुम्ही त्याही परिस्थितीत त्याचे सामाजिक दृष्टिकोनातून केलेले संवेदनशील असे चिंतन आणि त्याला सकारात्मकतेचा दिलेली जोड हा खूपच महत्वाचा या पुस्तकाचा भाग आहे .... आणि इतक्या गंभीर परिस्थिती त पण शाबूत असलेली विनोदबुद्धी ... उदा. हॉस्पिटलमध्ये चावणाऱ्या डासांचे वर्णन ........ .....
या सगळ्यातून बाहेर पडून आपण पूर्ववत आयुष्य जगत आहात , या सर्व कठीण परिस्थितीमध्ये तुमच्या जोडीदारीनीने दिलेली साथ , कुटुंबीयांची , आणि अनेक सुहृदयांची मिळालेली मदत आणि त्याबाबतची कृतज्ञता व्यक्त करताना समाजासाठी काही करत राहणे हि संवेदनशीलताही खूप महत्वाची आहे ,त्यादिवशीचा पुस्तक प्रकाशन सोहळा हा नुसताच प्रकाशन सोहळा नव्हता तो एक कृतज्ञता सोहळाच होता असे वाटले ...
आपण आपल्या आजूबाजूच्या सामाजिक प्रश्नांवर बोलत असतो ,काही मांडत असतो ..... कोविड महामारीनंतर आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो ...... याबाबत खरेच काही ठोस काम करता येईल का ? त्यादिवशी कार्यक्रमात मा . श्री .आंग्रे सर यांनी सिव्हिल हॉस्पिटलची व्यवस्था कशी सुधारता येईल याबाबत एक मुद्दा मांडला होता .... याकरिता माझी काही मदत लागली तर जरूर सांगाल ....भविष्यातल्या अशा कोणत्याही महामारीला तोंड देण्यासाठी लागणाऱ्या पूर्वतयारीच्या दृष्टीने किमान एक पाऊल पुढे तरी टाकता येईल .....
अनेक शुभेच्छांसहीत ..
सुनीता पवार ,
विवाह समुपदेशक ,
कौटुंबिक न्यायालय ,रायगड -अलिबाग