Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
नरसय्या आडम, म्हणजेच आडम मास्तरांशी माझा दीर्घकाळ परिचय आहे. आधी कामगार कार्यकर्ता, नंतर सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आणि पुढे तीन वेळा आमदार म्हणून मी त्यांना पाहिलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव आणि केंद्रीय कमिटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
आयुष्यभर कित्येक लढायांचे नेतृत्व केलेल्या या सेनानीचा एक पाय लोकांच्या वस्तीत तर दुसरा तुरुंगात राहिला आहे. शोषितांच्या हक्कासाठी प्राण पणाला लावताना हा कॉम्रेड कधीही डगमगला नाही. कम्युनिस्ट स्वप्न उराशी बाळगून मास्तरांनी इतरांना अशक्य कोटीतील वाटणाच्या प्रकल्पांच केवळ स्वप्नच पाहिलं नाही, तर ते प्रकल्प वास्तवात उभे केले, हजारो बेघरांच्या डोक्यावर सावली धरणारा हा विलक्षण हिमतीचा कार्यकर्ता आहे.
सर्व प्रकारचे अत्याचार आणि शोषण कायमचे नष्ट करून मानवतेवर आधारित समाज घडवण्यासाठी जगभरातील कम्युनिस्ट आपल्या व्यक्तिमत्त्यातील पोलाद अथकपणे परजत आले आहेत. आडम मास्तर हे अशा लढ़वय्यापैकी एक आहेत. हे आत्मचरित्र वाचकांना आपल्या अंतरंगातील पोलाद परजण्याची स्फूर्ती देईल, याची मला खात्री आहे. सीताराम येच्युरी सरचिटणीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष