Summary of the Book
व्यवसाय, नोकरी करताना वरिष्ठांवर आपला पहिला प्रभाव संवादातून पडतो. मुलाखात घेण्याचा उद्देश हाही एक असतो. त्यानंतर वेशभूषा प्रभावही समोरच्या व्यक्तीवर पडतो. सभ्यता, नेटवर्किंग, मनोरंजन, समज-कौशल्य अशा अनेक गोष्टींमधून प्रभाव पडतो.
सेल्स, मार्केटिंगमध्ये तर प्रभावी संवाद साधने हे अत्यावश्यक असते. हे साध्य कसे करता येते याचे धडे शीतल कक्कर मेहरा यांनी 'व्यवसायातील इम्प्रोसिव्ह मॅनर्स'मधून दिले आहेत. इम्प्रेसिव्ह सभाषणकलेत तुमचा आवाज, शब्दांची निवड, संभाषणातील चुका, राजीनामा देण्याची पद्धत,
महिला एक्झिक्युटिव्हमधील आवश्यक गुण, नोकरीच्या ठिकाणी स्त्री-पुरुषांमधील संभाषण, देहबोली, व्हर्च्युअल मिटिंग, इम्प्रेसिव्ह वेशभूषा करताना पदाला, नोकरीच्या ठिकाणी शोभतील असे कपडे वापरणे, निर्दोष राहणीमान कसे असावे, फॉर्मल-इनफॉर्मल कपडे कधी वापरावेत, ब्लेझर, जॅकेट यांचा वापर, महिलांची वेशभूषा, व्यावसायिक, सभ्यतेचे नियम, वेळेचे महत्व, स्त्री-पुरुष सहकाऱ्यांची वर्तणूक, नेटवर्किंग वाढविण्याची कला, व्यावसायिक मनोरंजन, समाजात वावरताना, पाळावयाचे नियम, यांबाबत अगदी छोट्या-मोठ्या गोष्टींबद्दल येथे मार्गदर्शन केले आहे. याचा मराठी अनुवाद मेधा तडपत्रीकर यांनी केला आहे.