Summary of the Book
भारतीय कलेने स्वातंत्र्यचळवळीत दिलेले योगदान आणि समाजजीवनावर कलेने पाडलेला प्रभाव यांचं विश्लेषण करणारा सुहास बहुळकर यांचा लेख , तबला घडवणाऱ्यांवर अनिल अवचट यांचा लेख , ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्यावर रामदास भटकळ यांचा लेख याशिवाय नंदिनी आत्मसिद्ध , नरेंद्र चपळगावकर , प्रिया जामकर , शोभा बोंद्रे , शरद वर्दे यांच्या लेखांचा यंदाच्या ' दीपावली ' अंकात समावेश आहे .
भारत सासणे यांच्या दीर्घकथेखेरीज सुबोध जावडेकर , मुकुंद टाकसाळे , नीरजा , अरुण वर्टी यांच्या कथा , सतीश आळेकर यांची एकांकीका , ना . धों . महानोर , प्रवीण दवणे , संतोष शेणई यांच्यासहन अनेक मान्यवरांच्या कविता आणि व्यंगचित्रे यांनी हा अंक परिपूर्ण केला आहे .