Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
संपादक डॉ. र. बा. मंचरकर असणारा 'सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य' हा ग्रंथ साहित्यप्रवाह आणि परिवर्तनाची गतिमानता दृढमूल करणारा म्हणायला हवा. वाङ्मय बहुमुखी झाले; ही बाब आता अंधारात झाकून रहाणारी राहिलेली नाही. शिवाय, परिवर्तनही प्रवाह आणि एकंदर साहित्य यांच्या आधाराने सारे विधिनिषेध मोडून सीमापार झालेले आहे; हेही आता लपून राहिलेले नाही. बांधिलकी रुंद झाली आहे. विचारप्रणालींचे रिझल्ट मिळू लागले आहेत; आणि भूमिकांनी आपले अस्तित्त्व ठळक केलेले आहे. असे असले तरी जागतिकीकरणाने विचार बधिर केले, असाही एक आवाज वेगाने आपल्या दिशेने येतो; हे एकदम नाकारता येईल का?; याविषयी विचार टाळता यायचा नाही.
परिवर्तनाचा वेग हा हरणांचा वेग आहे; साहित्याचा आजचा हा वेग कसा?; याबद्दल मेरिटस्तरावर विचार केला तर थोडे स्तंभित व्हावे; असेही वातावरण नाही म्हटले तरी वाढताना दिसत आहे. गुणवत्ता दिसत असली तरी तिचे विस्तारक्षेत्र वाढतेय असे आढळत नाही. अशा स्थितीत 'सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य' हा डॉ. वासुदेव मुलाटे गौरवग्रंथ निराशेचे मळभ दूर सारू पहाणारा म्हटला पाहिजे. चळवळींची गतिकुंठितता, माणसांचे हरवलेपण, साहित्यनिमिर्तीचे दर्जाहिनत्व आणि लेखकांच्या गटबाजींचा बाजार हे सगळे आजचे दुर्दशादर्शन बघितले की, परिवर्तन आणि साहित्यविषयक मूलाधारी ग्रंथ वाचकांसाठी विचाराचा आधार व्हायला नक्कीच काही एक सहायता करतो. ग्रंथ संपादित असूनही त्यातील विचारसूत्र एकसंध व अधिक सजीव राहिले आहे.